Mahakumbh bus accident: महाकुंभ मेळ्यावरून परतताना काळाचा घाला, भाविकांची बस ट्रकला धडकली; ७ जणांचा जागीच मृत्यू

Jabalpur road accident bus crash: महाकुंभ मेळ्यावरून परतणाऱ्या भाविकांनी भरलेल्या बसचा मध्यप्रदेशातील जबलपूरमधील सिहोराजवळ अपघात घडला आहे. या भीषण अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
Mahakumbh accident
Mahakumbh accidentSaam Tv News
Published On

महाकुंभ मेळ्यावरून परतणाऱ्या भाविकांनी भरलेल्या बसचा मध्यप्रदेशातील जबलपूरमधील सिहोराजवळ अपघात घडला आहे. या भीषण अपघातात प्रवासी बस एका ट्रकला धडकली. ज्यात ७ भाविकांचा जागीच मृत्यू झालाय. तर, अनेक जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर झाली आहे. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच जबलपूरचे जिल्हाधिकारी आणि एसपी घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीला सुरूवात केली आहे.

अपघात कधी आणि कसा घडला?

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ९:१५ च्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग ३० वर हा बसचा भीषण अपघात घडला. प्रवासी बस एक ट्रकला धडकली. या अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर काही प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे.

Mahakumbh accident
Kolhapur News: परीक्षा देऊन घरी येताना काळाचा घाला, ऊसाचा ट्रॅक्टर अंगावरून गेला; कोल्हापुरात हळहळ

या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. बस आणि ट्रकची धडक इतकी भीषण होती की, बसच्या काही भागाचे तुकडे झाले आहेत. स्थानिक लोक ट्रकच्या छतावर चढून प्रवांशाची मदत करत आहेत. घटनास्थळी क्रेन देखील पोहोचली आहे. या अपघातात आणखी कुणी बसमध्ये अडकले आहेत का? याचा तपास सुरू आहे.

Mahakumbh accident
Crime News: लग्नाचे आमिष दाखवून मामाच्या मुलीवर बलात्कार, व्हिडिओ शूट करून करायचा ब्लॅकमेल

बस प्रयागराजहून परतत होती

मिळालेल्या माहितीनुसार, भाविकांनी भरलेली बस प्रयागराज महाकुंभ मेळ्यातून परतत होती. मोहला आणि बर्गी गावादरम्यान बस पोहोचताच समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिली. सिमेंटनं भरलेला ट्रक चुकीच्या दिशेनं येत होती. त्यामुळे हा अपघात घडला असल्याचं बोललं जातंय. बसमध्ये अजूनही काही प्रवासी अडकल्याची माहिती आहे. प्रशासन आणि पोलिसांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. बसमधील प्रवासी हे आंध्र प्रदेश येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com