Kolhapur News
Kolhapur NewsSaam Tv News

Kolhapur News: परीक्षा देऊन घरी येताना काळाचा घाला, ऊसाचा ट्रॅक्टर अंगावरून गेला; कोल्हापुरात हळहळ

Tractor accident in Kolhapur: कोल्हापुरच्या शाहूवाडीत एक धक्कादायक घटना घडली आहे. शिष्यवृ्त्तीची परिक्षा देऊन घरी जाणाऱ्या विद्यार्थ्याचा ट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्यानं जागीच मृत्यू झालाय.
Published on

शिष्यवृत्तीची परिक्षा देऊन घरी जाणाऱ्या विद्यार्थ्याचा ट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्यानं जागीच मृत्यू झालाय. ही धक्कादायक घटना कोल्हारपुरच्या शाहूवाडी येथील पिशवी पैकी व्हनांगडेवाडी येथे घडली आहे. तरूण शिष्यवृत्तीची परिक्षा देऊन घरी जात असताना हा अपघात घडला. या घटनेची नोंद शाहूवाडी पोलीस ठाण्यात झाली. या घटनेनंतर परिसरातून शोक व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिशवी पैकी व्हनांगडेवाडी ता. शाहूवाडी येथील श्रीधर व्हनांगडेचा अपघाती मृत्यू झाला आहे. श्रीधर हा इयत्ता आठवीत शिकत होता. बांबवडे येथीस महात्मा गांधी विद्यालयात तो शिक्षण घेत होता. १० फेब्रुवारीला त्याची शिष्यवृत्तीची परिक्षा होती. पेपर संपल्यानंतर तो पायी आपल्या मित्रांसोबत घरी जात होता.

Kolhapur News
Viral Video: पिंजऱ्यात शिरला, वाघाला वाकुल्या केल्या; झाडावरून पाय घसरताच..

दरम्यान, साखर कारखान्याहून ऊस उतरून ट्रॅक्टर रिकामा परतत होता. विद्यार्थ्यांनी हात करून थांबवले रिकाम्या ट्रॅक्टरमध्ये विद्यार्थी चढले. घराजवळ आल्यावर ट्रॅक्टर चालकाला न सांगताच श्रीधरने ट्रॅक्टरमधून उडी मारली. उडी मारल्यानंतर त्याचा तोल गेला. तोल गेल्यामुळे तो ट्रॉलीच्या मागील चाकाखाली सापडला. चाकाखाली आल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

Kolhapur News
Ranveer Allahabadia: 'त्या' घाणेरड्या वक्तव्यावर यूट्यूबर रणवीरनं मागितली माफी; मुख्यमंत्री म्हणाले, मर्यादा ओलांडल्या तर..

श्रीधरला लगेच बांबवडे येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा जागीच मृत्यू झाला. श्रीधर हा एकुलता एक होता. आई - वडील आणि बहीण असा त्याचा परिवार आहे. ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलंय. या घटनेमुळे परिसरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com