Ranveer Allahabadia: 'त्या' घाणेरड्या वक्तव्यावर यूट्यूबर रणवीरनं मागितली माफी; मुख्यमंत्री म्हणाले, मर्यादा ओलांडल्या तर..

Devendra Fadnavis on India’s Got Latent: रणवीरनं इंडियाज गॉट लेटेंट शोमध्ये केलेल्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच व्हिडिओ शुट करून माफी मागितली आहे. व्हिडिओ व्हायरल.
CM On Ranveer
CM On RanveerSaam Tv News
Published On

समय रैनाचा 'इंडियाज गॉट लेटेंट' हा शो युट्यूबर रणवीर अलाहाबादियामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. रणवीर अलाहाबादियानं एका स्पर्धकाला त्यांच्या पालकांबद्दल आक्षेपार्ह प्रश्न विचारला. त्यानंतर रणवीरवर चौफेर बाजूनं टीका झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. 'प्रत्येकाच्या मर्यादा असतात. जर कुणी त्या मर्यादा ओलांडल्या तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल', अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशातच रणवीरनं एक व्हिडिओ पोस्ट करत घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे.

'माझ्याकडून चूक झाली'

रणवीरनं इंडियाज गॉट लेटेंट शोमध्ये केलेल्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच व्हिडिओ शुट करून माफी मागितली आहे. 'मी इंडियाज गॉट लेटेंट या शोमध्ये जे काही बोललो ते बोलायला नको होतं. मला माफ करा. माझी टिप्पणी फक्त चुकीची नव्हती, तर हास्यास्पद देखील नव्हती. कॉमेडी मला जमत नाही. मी इथे फक्त माफी मागायला आलो आहे. जे मी विधान केलं ते अजिबात चांगलं नव्हतं, माझ्याकडून चूक झाली', असं म्हणत रणवीरनं व्हिडिओद्वारे माफी मागितली.

CM On Ranveer
Road Accident: संभाजीनगरत भीषण अपघात, पिकअपची ट्रॉलीला धडक, आगीचा भडका उडाला, दोघांचा मृत्यू

'मर्यादा ओलांडल्या तर कारवाई केली जाईल'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शोबद्दल सांगितलं, 'मला कळालं की, या शोमध्ये काही गोष्टी अश्लील पद्धतीनं चालवल्या जात आहेत. जे अत्यंत चुकीचं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वांना आहे. पण प्रत्येकाच्या मर्यादा असतात. जर कुणी त्या मर्यादा ओलांडल्या किंवा नियम मोडले तर, त्यांच्यावर कारवाई केली जाईल', असं मुख्यमंत्री म्हणाले.

CM On Ranveer
Nashik City Bus: बस जोरात खड्ड्यात आदळली, प्रवाशाच्या पोटाला बसला जबर मार; जागेवरच जीव सोडला

पोलिसांकडून कारवाई

'इंडियाज गॉट लैटेंट' शोमध्ये रणवीर अलाहाबादिया यानं केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पोलिसांनी चौकशीला सुरूवात केली आहे. मुंबई खार वेस्ट परिसरातील दि हॅबिटेट इमारतीच्या पहिला मजल्यावर पोलिसांनी कारवाई करत, इमारतीचे मालक त्याचबरोबर इंडियाज गॉट लैटेंट शोचे काही सदस्य कर्मचार्‍यांची चौकशी केली आहे. या घटनेनंतर मुंबई पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्र महिला आयोगाकडे या शोच्या पॅनेल सदस्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीत शोमध्ये अभद्र भाषा आणि अश्लीलतेला प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com