Manohar Dhakad Viral Video : हायवेवरील कांड भोवला; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर धाकड अडकला, पोलिसांकडून काय कारवाई होणार?

manoharlal dhakad highway video : मनोहरलाल धाकडला हायवेवरील कांड भोवला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनोहरलाल धाकड चांगलाच अडकलाय.
manoharlal dhakad highway video
manoharlal dhakad Saam tv
Published On

मध्य प्रदेशच्या मंदसौर जिल्ह्यातील एक खळबळजनक घटना घडली. एका राजकीय नेत्याच्या कृत्याची सर्वत्र चर्चा होत आहे. राजकीय नेता मनोहरलाल धाकड त्याच्या मैत्रिणीसोबत शारिरीक संबंध ठेवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या दोघांचा व्हिडिओ पाहून अनेक अवाक झाले आहेत. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवर १३ मे रोजी ही घटना घडली. या दोघांचं कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी धाकडवर गुन्हा नोंदवला असून त्याचा शोध सुरु आहे.

manoharlal dhakad highway video
Vaishnavi Hagawane : राजकीय नेत्याकडून सुनेचा हुंडाबळी; वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची A टू Z माहिती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भानपुरा पोलिसांनी मनोहरलाल धाकड आणि त्याच्या मैत्रिणीवर भारतीय न्याय संहितेचे कलम २९६ (सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्ये), कलम २८५ (जीव आणि मालमत्तेला धोका निर्माण करणे) आणि कलम ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या कलमाअंतर्गत पोलिसांकडून कारवाई होणार आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर धाकड फरार झालाय. धाकडचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या पथकांची स्थापना करण्यात आली आहे. धाकडच्या सीसीटीव्हीत दिसणारी पांढरी कार त्याच्याच नावावर नोंद आहे. धाकडची पत्नी सोहन बाई बानी जिल्हा पंचायतची सदस्य आहे.

मनोहरलाल धाकडचं राजकीय कनेक्शन उघडकीस आल्यानंतर भाजप जिल्हा अध्यक्ष राजेश दीक्षित यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. राजेश दीक्षित यांनी म्हटलं की, 'मनोहरलाल धाकड भाजपचा प्राथमिक सदस्य नाही. त्याची पत्नी जिल्हा पंचायत सदस्य आहे. परंतु पत्नीचाही थेट भाजपशी संबंध नाही'.

manoharlal dhakad highway video
Vaishnavi Hagawane Case : राजकारण्यांच्या घरात चाललंय काय? आतापर्यंत कोणत्या नेत्यांच्या कुटुंबामध्ये छळाचे प्रकार घडलेत?

हायवेवरील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर धाकडवर टीकेचा भडीमार होत आहे. धाकडची महासभा युवा संघाच्या पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. संघटनेची प्रतिष्ठा राखण्यासाठी निर्णय घेतल्याचं राष्ट्रीय अध्यक्ष अर्जुन धाकड यांनी सांगितलं. धाकड या संघटनेत राष्ट्रीय मंत्री पदाचं कामकाज सांभाळत होता.

manoharlal dhakad highway video
Corona Virus Update : चिंताजनक! ठाण्यात कोरोनाचा पहिला बळी; धाकधूक वाढली

दरम्यान, रतलाम भागातील पोलीस उपमहानिरीक्षक मनोज सिंह यांनी धाकडच्या कृत्याचा निषेध केला आहे. सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करणे स्वीकारण्यासारखे नाही. धाकडने कायदा मोडला आहे. त्याच्या कृत्याने कायदा आणि सार्वजनिक सुव्यवस्थेचेही उल्लंघन होते. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास केला जात आहे. आरोपी धाकडच्या मुसक्या आवळण्यासाठी आजूबाजूच्या पोलिसांना अलर्ट करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com