Vaishnavi Hagawane Case : राजकारण्यांच्या घरात चाललंय काय? आतापर्यंत कोणत्या नेत्यांच्या कुटुंबामध्ये छळाचे प्रकार घडलेत?

Vaishnavi Hagawane Death Case: पुण्यातील वैष्णवीच्या मृत्यूनं राजकीय कुंटुंबातील महिलांच्या छळाचा मुद्दा ऐरणीवर आलाय.. आतापर्यंत राज्यात कोणत्या राजकीय नेत्यांच्या कुटुंबामध्ये छळाचे प्रकार घडलेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून
Vaishnavi Hagawane Dowry case
Vaishnavi Hagawane Dowry Harassment Case Updates:Saam tv
Published On

महिला शिक्षणाची ज्योत पेटवणारा महाराष्ट्र.....महिलांसाठी आरक्षणाची कवाडं उघड करणारा पुरोगामी महाराष्ट्र.... मात्र याच महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाला पैशांसाठी हपापलेल्या राजकीय पुढाऱ्यांनी सुरुंग लावलाय...अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पुढारी असलेल्या राजेंद्र हगवणे आणि त्याच्या कुटुंबियांनी हुंड्यासाठी केलेल्या छळामुळेच वैष्णवीचा मृत्यू झालाय... 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी, साडेसात किलो चांदीची भांडी एवढंच नाही तर कोट्यावधीची उधळण करुनही कस्पटे कुटुंबियांच्या हाती फक्त वैष्णवीचा मृतदेह आणि आयुष्यभरासाठीचं दुःखच आलंय... त्यामुळेच राजकीय नेत्यांच्या घरात चाललंय काय? असा प्रश्न निर्माण झालाय...

Vaishnavi Hagawane Dowry case
Vaishnavi Hagawane Case : हुंड्याच्या पैशांमधून उभारलेली प्रॉपर्टी पेटवून द्या; वैष्णवी हगवणे प्रकरणावर प्रवीण तरडेंचा संताप

असा छळ होत असेल तर महाराष्ट्र कुठे चाललाय, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. राजकीय नेते म्हणजे राज्याला दिशा देणारे नेतृत्व मानलं जातं... मात्र बेटी बचाओ बेटी पढाओचा नारा देणाऱ्या पक्षाचेच माजी खासदार रामदास तडस यांच्या सुनेनं छळाचे गंभीर आरोप केलेत.

Vaishnavi Hagawane Dowry case
Maharashtra Cyclone : महाराष्ट्रावर संकट; 'शक्ती' चक्रीवादळाचा धोका वाढला, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट? वाचा सविस्तर

महाराष्ट्रातील राजकीय पुढाऱ्यांकडून महिलांची होणारी कौटुंबिक छळाची मालिका इथेच थांबत नाही... तर या छळात महिला नेत्याही आढळून आल्यात....

एवढंच नाही तर धनंजय मुंडे यांच्यावरही करुणा मुंडेंनी घरगुती हिंसाचाराचा आरोप केलाय.. या प्रकरणी वांद्रे न्यायालयाने धनंजय मुंडेंना दोषी ठरवलंय... तर दुसरीकडे महाराष्ट्रात वर्षाला सरासरी 45 हजार महिला घरगुती हिंसाचाराच्या शिकार होत असल्याचं चित्र आहे..

Vaishnavi Hagawane Dowry case
IPS Transfers : राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका; पाहा कुणाची कुठे बदली?

त्यामुळे खादीच्या आत लपलेले बगळेच लाडक्या बहीणींचे शिकारी आहेत... खरंतर नेत्यांचा आदर्श कार्यकर्ते घेत असतात.. मात्र नेतेच जर महिलांचा सन्मान ठेवत नसतील तर कार्यकर्त्यांकडून काय अपेक्षा करणार.... त्यामुळेच आता राजकीय नेत्यांनी स्वतःच्याच मनात खोलवर डोकावण्याची आणि अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे.....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com