Vaishnavi Hagawane Case : हुंड्याच्या पैशांमधून उभारलेली प्रॉपर्टी पेटवून द्या; वैष्णवी हगवणे प्रकरणावर प्रवीण तरडेंचा संताप

Pravin tarde on Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे प्रकरणावर मराठी सिनेसृष्टीतल प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी संताप व्यक्त केला आहे. तरडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.
 Vaishnavi Hagawane Case
Pravin tarde on Vaishnavi Hagawane Case Saam tv
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही

Vaishnavi Hagawane news : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर संताप व्यक्त केला जात आहे. वैष्णवीच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या हगवणे कुटुंबावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. वैष्णवीच्या आत्महत्येने पुरोगामी महाराष्ट्रातील क्रूर हुंडा पद्धतीचं वास्तव पुन्हा एकदा समोर आलं आहे. या घटनेच्या विरोधात सर्वसामान्यांकडून निषेध नोंदवला जात आहे. आता वैष्णवी हगवणे प्रकरणावर दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी संताप व्यक्त केला आहे.

पुण्यातील हगवणे कुटुंबाचे नवनवीन कारनामे समोर येत आहेत. वैष्णवीच्या मृत्यूनंतर हगवणे कुटुंबाच्या छळछावणीचं धक्कादायक वास्तव उघडकीस आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांवर कारवाई केली आहे. वैष्णवीसोबत मोठी सून मयुरीचाही छळ करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे हगवणे कुटुंबाचे काळे कारनामे समोर येत आहेत.

याच हगवणे कुटुंबाने वैष्णवीच्या आई-वडिलांकडून ५१ तोळे सोने आणि अलिशान गाडी आणि बरंच काही हुंड्यात घेतलं होतं. हुंडा देऊनही वैष्णवीच्या यातना संपल्या नाही. त्यानंतर वैष्णवीने १६ मे रोजी मृत्यूला कवटाळलं. याच घटनेवर दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून संताप व्यक्त केला.

 Vaishnavi Hagawane Case
Maharashtra Cyclone : महाराष्ट्रावर संकट; 'शक्ती' चक्रीवादळाचा धोका वाढला, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट? वाचा सविस्तर

हगवणे कुटुंबीयांनी हुंड्याच्या पैशांमधून उभारलेली प्रॉपर्टी पेटवून द्या, अशी संतप्त पोस्ट प्रवीण तरडे यांनी केली. पिंपरी चिंचवड येथील वैष्णवी हगवणे प्रकरण सध्या सुरू असताना प्रवीण तरडे यांची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. कुणा बहिणींचा असा छळ सुरू असेल तर पुढे येऊन बोला, असे आवाहन सुद्धा प्रवीण तरडे यांनी केलं आहे. फेसबुकवर प्रवीण तरडे यांच्या पोस्टची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

 Vaishnavi Hagawane Case
IPS Transfers : राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका; पाहा कुणाची कुठे बदली?

काय आहे प्रवीण तरडे यांची पोस्ट?

प्रवीण तरडे म्हणाले,'हुंड्याच्या पैशांमधून उभारलेली घरंदारं प्रॉपर्टी पेटवून द्या. कुणा बहिणींचा असा छळ चालू असेल तर पुढे येऊन बोला. समाज म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com