Pravin Tarde Song: प्रवीण तरडे यांची नवी इनिंग, 'बोल मराठी' गाण झालं प्रदर्शित

New Marathi Song Released: अभिनेता प्रवीण तरडे याचं 'बोल मराठी' हे गाणं रिलीज झालं आहे. बोल मराठी या म्युझिक व्हिडिओची निर्मिती लंकेश म्युझिकने केली आहे. प्रवीण तरडे यांच्यासह मृण्मयी फाटक यांनीही गायन केलं आहे.
Bol Marathi New Song
Prvin Tarde SongSaam Tv
Published On

शिवछत्रपतींच्या मराठी लेकरांनो, काय सांगतोय ते नीट ऐका असं म्हणत मराठी भाषेची थोरवी असलेला 'बोल मराठी' हा नवा म्युझिक व्हिडिओ लाँच करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रवीण तरडे यांनी हे गाणं गायलं असून, या गाण्याचं संगीत अभिजीत कवठाळकर यांनी दिलं आहे.

Bol Marathi New Song
Indian Idol 15 winner: मानसी घोषने जिंकला 'इंडियन आयडल १५'चा किताब; रेकॉर्ड केलं पहिलं बॉलिवूड गाणं

बोल मराठी या म्युझिक व्हिडिओची निर्मिती लंकेश म्युझिकने केली आहे. प्रवीण तरडे यांच्यासह मृण्मयी फाटक यांनीही गायन केलं आहे. हृषिकेश विदार यांनी गीतलेखन केलेल्या या म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शन राजेश कोलन यांचं आहे. योगेश कोळी यांचं छायांकन, अमोल निंबाळकर यांनी संकलन, तक सिद्धार्थ तातूसकर यांनी कला दिग्दर्शन केलं आहे.

मराठी भाषेला अलीकडेच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. या अनुषंगाने मराठी भाषेची महती बोल मराठी या गाण्यात सांगण्यात आली आहे. अत्यंत सोपे शब्द, श्रवणीय संगीत असलेलं हे गाणं आहे. संगीतकार अभिजीत कवठाळकर यांनी आतापर्यंत अनेक मराठी चित्रपट, म्युझिक व्हिडिओचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. तर प्रवीण तरडे यांनी प्रथमच म्युझिक व्हिडिओचं गाणं गायलं आहे. युट्यूबवर लंकेश म्युझिक या चॅनेलवर हा म्युझिक व्हिडिओ लाँच करण्यात आला आहे.

Bol Marathi New Song
Jaya Bachchan : एका फोटोसाठी जया बच्चन चाहत्यावर संतापल्या, पाहा व्हायरल VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com