
काळजाला पीळ पाडणारा हा आक्रोश आहे वैष्णवीच्या आईचा...डोळ्यात हजारो स्वप्न घेऊन जगणाऱ्या वैष्णवीनं आयुष्य संपवलंय.. आणि त्याला कारण ठरलाय हुंडा नावाचा शाप.....अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष असलेल्या राजेंद्र हगवणेचा मुलगा शशांकसोबत 2023 मध्ये वैष्णवीचं लव्हमॅरेज झालं... मात्र लग्न झालं, प्रेम संपलं आणि सुरु झाला हुंड्यासाठीचा छळ.. कधी आईवडीलांकडे तर कधी आपल्या सहा महिन्याच्या बाळाकडे जगत छळ सहन करणाऱ्या वैष्णवीच्या यातनांचा अंत अखेर मृत्यूनं संपला...वैष्णवीचा जाच मृत्यूपुर्वी मैत्रिणीसोबतच्या संवादातून समोर आलाय...
धक्कादायक बाब म्हणजे वैष्णवीच्या मृत्यूनंतर आम्हीच तिला मारुन टाकल्याची कबुली राजेंद्र हगवणेनं तिच्या वडीलांसमोरच दिल्याचं एफआयआरमधून समोर आलंय...
एप्रिल 2023
हगवणे कुटुंबाला हुंडा म्हणून 51 तोळे सोने, फॉर्च्युनर गाडी, 7 किलो चांदीची भांडी दिले
ऑगस्ट 2023
वैष्णवीने गरोदर असल्याचं सांगताच बाळ माझं नाही दुसरं कुणाचं असेल, असं शशांकचं वक्तव्य
घरातून चालती हो म्हणत वैष्णवीला मारहाण
नोव्हेंबर 2023
सासरच्या जाचाला कंटाळून वैष्णवीचा आत्महत्येचा प्रयत्न
15 दिवसांनी शशांक हगवणेकडून जमीन घेण्यासाठी 2 कोटींची मागणी
पैसे न दिल्यानं वैष्णवीचा छळ
किरकोळ कारणांवरुन पती, सासू, नणंद, सासऱ्याकडून मारहाण
16 मे 2025
शशांक हगवणेनं फोन करुन वैष्णवीनं फाशी घेतल्याचं सांगितलं
वैष्णवीच्या मृत्यूबाबत शशांक आणि राजेंद्र हगवणेकडे विचारणा
तू पैसे दिले नाहीत, मग फुकट नांदवायची का? म्हणून मारुन टाकल्याची कबुली
हगवणे हे सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या मोठं कुटुंब असल्यानं तिच्या लग्नाला होकार दिला.. मात्र आता पश्चाताप होत असल्याचं नातेवाईकांनी म्हटलंय.. एवढंच नाही तर तिच्या 6 महिन्यांच्या बाळाचाही ठावठिकाणा लागत नसल्याचं तिच्या वडिलांनी म्हटलंय..तर हा हुंडाबळीचा प्रकार असल्यानं वैष्णवीच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी वैष्णवीच्या मामानं केलीय..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.