Naval Kishore Ram : पुण्याला मिळाले नवीन आयुक्त; कोण आहेत नवल किशोर राम? वाचा एका क्लिकवर

naval kishor ram News : पुण्याच्या नवीन आयुक्तपदी नवल किशोर राम यांची नियुक्ती झाली आहे. ते २००७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
naval kishor ram  News
naval kishor ram Saam tv
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही

Pune News : पुण्यातून मोठी बातमी हाती आली आहे. पुणे महापालिकेला नवीन आयुक्त मिळाले आहेत. आता पुणे महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी नवल किशोर राम सांभाळणार आहेत. डॉ. राजेंद्र भोसले निवृत्त झाल्यानंतर पुण्याला नवीन आयुक्त मिळाले आहेत. नवल किशोर राम यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणूनही धुरा सांभाळली आहे.

कोण आहेत नवल किशोर राम?

पुणे महापालिकेचे नवीन आयुक्त नवल किशोर राम असणार आहेत. नवल किशोर राम हे २००७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते मूळ बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील मोतीहारी गावचे आहेत. सन 2007 मध्ये ते आपीएस झाले आणि पुढे त्यांची आयएएसमध्ये निवड झाली. राम यांची पहिली नियुक्ती नांदेड येथे झाली होती. त्यानंतर त्यांनी यवतमाळ जिल्हा परिषदेत दोन वर्षे काम केले.

naval kishor ram  News
Crime News : खळबळजनक! आधी तरुणीची हत्या केली, नंतर सुटकेसमध्ये मृतदेह भरून धावत्या ट्रेनमधून फेकलं

बीड आणि तेव्हाचे औरंदबाद येथे जिल्हाधिकारी म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं आहे. २०२० मध्ये नवल किशोर राम हे पुण्याचे जिल्हाधिकारी होते. कोरोना संकाटाच्या काळात त्यांनी स्वतः गावोगावी जाऊन भेटी दिल्या होत्या. देशभरातील सर्वोत्तम जिल्हाधिकारी म्हणून देखील त्यांना सन्मानित करण्यात आलं. पुण्यातून त्यांची थेट पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती.

naval kishor ram  News
Mumbai to Konkan : मुंबईतून मालवणात फक्त ४ तासांत; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

यवतमाळात पहिल्या दिवशी 32 कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या

यवतमाळ जिल्हा परिषदेत प्रशासकीय बदली प्रक्रिया सुरू झाली आहे. यवतमाळात पहिल्याच दिवशी 32 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. प्रशासनातील कृषी, पाणीपुरवठा, बांधकाम, महिला व बालकल्याण तसेच सामान्य प्रशासन विभागाचाही समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या नव्हत्या.

यामुळे बदलीसाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत होता. यवतमाळ जिल्हा परिषद प्रशासनाने बदलांचे वेळ पत्रक तयार केले. त्यानंतर पहिल्याच दिवशी सामान्य प्रशासन विभागातील विस्तार अधिकारी,सांख्यिकी तीन,15 वरिष्ठ सहाय्यकांची बदली करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com