Mumbai to Konkan : मुंबईतून मालवणात फक्त ४ तासांत; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

mumbai to konkan by boat : मुंबईतून मालवणपर्यंतचा प्रवास आता फक्त ४ तासांत होणार आहे. फडणवीस सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.
Maharashtra Government
mumbai to konkan by boat Saam
Published On

गणेश कवडे, साम टीव्ही

गणपतीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर हाती आली आहे. गणपतीत आता समुद्र मार्गे प्रवास करता येणार आहे. चाकरमान्यांना कमी वेळेत गावी पोहोचवण्यासाठी मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे. फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे साडेचार तासांत मालवण, विजयदुर्ग तर तीन तासांत रत्नागिरी गाठता येणार आहे. आता मुंबईतील माझगावपासून मालवण, विजयदुर्ग, रत्नागिरीपर्यंत जलवाहतूक सेवा सुरू होणार आहे.

जलवाहतूक सेवा सुरू झाल्याने चाकरमानी कमी वेळेत कोकणात पोहोचणार आहेत. हायटेक यंत्रणा असलेल्या एम टू एम या बोटीमार्फत कोकणात प्रवास करणार आहेत. फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे चाकरमान्यांचा मोठा त्रास कमी होणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय मानला जात आहे.

Maharashtra Government
Mumbai Corona Update : मुंबईत पुन्हा लॉकडाऊन होणार? कोरोनानं पुन्हा मुंबईकरांना धडकी, VIDEO

चाकरमान्यांचा त्रास कमी होणार

गणेशोत्सवात कोकणात जाताना चाकरमान्यांना रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडीने होणारी परवड आणि वेळखाऊ प्रवासाचा त्रास चाकरमान्यांसाठी नेहमीचाच झाला आहे. या त्रासातून दिलासा देण्यासाठी मत्स्य व बंदरे विभागाकडून मुंबईतील माझगावपासून मालवण, विजयदुर्ग, रत्नागिरीपर्यंत जलवाहतूक सेवा सुरू करण्यात येणार आहे.

Maharashtra Government
Railway Service Issue : मुसळधार पावसाचा फटका; कोकण रेल्वे विस्कळीत, प्रवाशांचे हाल, VIDEO

जलवाहतूक सेवेसाठी एम टू एम बोट वापरली जाणार आहे. येत्या २५ मे रोजी ती मुंबईतील भाऊचा धक्का येथे दाखल होणार आहे. फडणवीस सरकारमधील मंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतून परवडणाऱ्या दरात जलवाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. याकरिता एम टू एम ही बोट सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचे प्रयोजन आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हायटेक यंत्रणा असलेल्या एम टू एम या बोटीमार्फत पुन्हा एकदा जलवाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न आहे.

Maharashtra Government
Jalna Rain Today : तुफान पावसामुळे लग्नाचा मंडप उडाला; वऱ्हाडी मंडळींची तारांबळ, VIDEO

मुंबईतील माझगाव डॉक येथून प्रवास सुरू होईल. जवळपास साडेचार तासांत कोकणातील मालवण, विजयदुर्ग तर तीन तासांत रत्नागिरीपर्यंत पोहोचता येईल. लवकरच चाकरमान्यांना परवडतील, असे दर यासाठी निश्चित केले जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com