रिलसाठी सोडली लाज! धावत्या कारच्या खिडकीतून बाहेर आली, तरूणीनं भररस्त्यावर कपडे काढले, व्हिडिओ व्हायरल

Girl Performs Obscene Act on Shaheed Path: लखनऊच्या शहीद पथावरील व्हिडिओ व्हायरल. तरूणीनं धावत्या कारमध्ये कपडे काढले. पोलिसांकडून तपास सुरू.
Girl Performs Obscene Act on Lucknow Shaheed Path
Girl Performs Obscene Act on Lucknow Shaheed PathSaam
Published On
Summary
  • लखनऊच्या शहीद पथावर तरूणीचं अश्लील कृत्य.

  • धावत्या कारमध्ये तरूणीने कपडे काढले.

  • समाजमाध्यमांवर नेटकऱ्यांकडून टिका.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शहीद पथावर धावत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत तरूणीनं कपडे काढले. या तरूणीचा व्हिडिओ कुणीतरी शूट केला, तसेच समाज माध्यमांमध्ये व्हायरल केला. सध्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी टीकेचा वर्षाव केला आहे. दरम्यान, अश्लील स्टंट करणाऱ्या या मुलीची ओळख अद्याप पटलेली नसून, या व्हिडिओमुळे खळबळ उडाली आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये शहीद पथावरून एक कार वेगाने जात असल्याचं दिसून येत आहे. तरूणीनं कारची खिडकी उघडली. नंतर खिडकीतून बाहेर येत तरूणीनं कपडे काढण्यास सुरूवात केली. याचा व्हिडिओ रस्त्यावरून जाणाऱ्यांनी शूट केला. तसेच सोशल मीडियावर शेअर केला. व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली.

Girl Performs Obscene Act on Lucknow Shaheed Path
जबरदस्ती शारीरिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात; इरफाननं ओळख लपवून तरूणींना फसवलं

या प्रकरणात पोलीस मुलीबद्दल आणि कारमध्ये उपस्थित असलेल्या इतर लोकांबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. पोलीस इन्स्पेक्टर सुशांत गोल्फ सिटी उपेंद्र सिंह यांनी सांगितले की, 'कारचा नंबर गाझियाबादचा आहे. कार नंबरच्या आधारे, कार आणि कारमधील प्रवाशांचा शोध घेतला जात आहे. गाडी नेमकी कुणाची होती? याचा शोध घेतला जाईल. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे'.

Girl Performs Obscene Act on Lucknow Shaheed Path
मनोज जरांगे पाटलांच्या हत्येचा कट; आरोपीचा 'तो' व्हिडिओ व्हायरल, संतोष देशमुखांच्या भावाचं कनेक्शन काय?

पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात आरोपींविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला जाईल. तसेच कठोर कारवाई केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, याआधीही शहीद पथावर रील बनवण्याचे प्रकार उघडकीस आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com