

एलपीजीची मोठी खेप घेऊन होर्मुझ स्ट्रेटमधून भारताकडं निघालेलं शिवालिक जहाज आज, सोमवारी गुजरातच्या मुंद्रा बंदरात पोहोचलं आहे. हे जहाज होर्मुझ स्ट्रेटमध्ये अडकलं होतं. जहाज बांधणी मंत्रालयाने पत्रकार परिषदेत याबाबत महत्वाची माहिती दिली. दुसरीकडे, इराणमधून ५५० नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.
एलपीजीची मोठी खेप घेऊन निघालेले भारतीय जहाज होर्मुझ स्ट्रेट ओलांडून भारताकडे निघालं आहे. संध्याकाळपर्यंत ते निश्चित स्थळी पोहोचेल, असे जहाज बांधणी मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते. यासोबतच युद्धजन्य भाग विशेषतः होर्मुझ स्ट्रेटमध्ये अडकलेल्या जहाजांबाबत माहितीही दिली होती. २२ जहाज होर्मुझ स्ट्रेटच्या पश्चिमेकडे थांबलेले आहेत. तर कच्चं तेल घेऊन यूएईतून रवाना झालेले जग लाडकी जहाज सुरक्षितरित्या भारताकडे रवाना झालेले आहे, अशीही माहिती देण्यात आली होती. हे जहाज उद्यापर्यंत गुजरातच्या मुंद्रा बंदरात पोहोचेल. तर एलपीजी घेऊन भारताकडे निघालेले नंदा देवी जहाज उद्या कांडला बंदरात पोहोचेल.
इराणमध्ये अडकलेले ५५० भारतीय आर्मेनियाकडे रवाना झाले आहेत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी दिली. यापैकी २३४ नागरिक हे धार्मिक पर्यटनासाठी गेले होते. तर ९० जण अजरबैजानमार्गे भारतात परतत आहेत. अनेक अडथळे असतानाही तेहरानमधील भारतीय दूतावास पूर्णपणे सहकार्य करत आहेत. काही दिवसांपासून ते तेहरानच्या बाहेरील विद्यार्थ्यांना सुरक्षित असलेल्या शहरांमध्ये घेऊन जाण्यात यशस्वी ठरले आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली.
आखाती देशांमधून २० हजार नागरिक भारतात परतले आहेत. विविध विमानतळांवरून भारतातील वेगवेगळ्या ठिकाणांसाठी विशेष विमान सेवा सुरू आहे. ओमानमधूनही भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणांसाठी विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. कतारचं हवाई क्षेत्र काही प्रमाणात खुले आहे. तर कुवैतचं हवाई क्षेत्र २८ फेब्रुवारीपासून बंद आहे. बहरीन आणि इराकमध्ये जेथे हवाई क्षेत्र बंद आहे, तिथे भारतीय नागरिकांना सौदी अरेबियातून ये-जा करण्यासाठी मदत करण्यात येत आहे, अशी माहितीही परराष्ट्र मंत्रालयाचे जॉइंट सेक्रेटरी (गल्फ) असीम महाजन यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.