LPG Gas Crisis : गॅस टंचाईचं संकट टळणार; इराणनं दिली भारतासाठी गुड न्यूज

lpg gas crisis relief for india after iran statement : इराण-इस्रायल युद्धामुळं भारतावर गॅस टंचाईचं संकट घोंघावत असतानाच दिलासा देणारं वृत्त होर्मुझ स्ट्रेटमधून धडकलं आहे. भारत दोस्त असून, त्यांच्या तेल जहाजांना होर्मुझ स्ट्रेटमधून सुरक्षित वाट दिली पाहिजे, असं वक्तव्य इराणच्या राजदूतांनी केलंय.
भारतावरील 'गॅस' संकट टळणार
India - Iran On Gas Crisissaam tv
Published On

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध भडकलं आहे. त्यामुळं भारतासह जगभरात 'इंधन' टंचाईचा भडका उडाला आहे. भारतावरही 'गॅस' संकट घोंघावत आहे. मात्र, गॅसचा तुटवडा अजिबातच नाही, अशी सर्वसामान्यांना दिलासा देणारी वक्तव्ये सरकारच्या प्रतिनिधींकडून केली जात आहेत. हे संकट अधिक तीव्र होऊन टंचाईचा भडका उडण्याआधीच युद्धभूमी असलेल्या इराणमधून थेट भारतासाठी गोड वार्ता आली आहे.

भारत आपला मित्र आहे आणि त्यांच्या तेल जहाजांना अत्यंत महत्वाचा वैश्विक जलमार्ग होर्मुझ स्ट्रेटमधून सुरक्षित वाट मिळू शकते, असं दिलासादायक आणि अत्यंत महत्वपूर्ण विधान देशातील इराणचे राजदूत मोहम्मद फथली यांनी केलं आहे. प्रसारमाध्यमांना त्यांनी ही माहिती दिली. भारताच्या तेल जहाजांना होर्मुझ स्ट्रेटमधून सुरक्षित वाट मिळू शकेल का, अशी विचारणा माध्यम प्रतिनिधींनी फथली यांना केली. त्यावर भारत आमचा मित्र आहे. पुढील दोन ते तीन तासांत आपल्याला निश्चितच तसा घटनाक्रम बघायला मिळेल, असे संकेत त्यांनी दिले.

होर्मुझ स्ट्रेटमधून भारतीय जहाजांना सुरक्षित वाट दिल्याचं वृत्त लवकरच येऊन धडकेल. कदाचित पुढील दोन - तीन तासांतच हा घटनाक्रम समजेल, असे संकेत इराणच्या राजदूतांनी दिले. भारत हा आमचा मित्र असून, आमचा विश्वासही आहे, असेही ते म्हणाले.

'आम्ही एकमेकांना मदत करतो'

आमच्यासाठी ही दुर्दैवी वेळ आहे. त्यामुळेच भारत सरकार आम्हाला मदत करत आहे. आम्हालाही भारताची मदत केली पाहिजे. दोन्ही देशांमध्ये समान भावना, आपुलकी आणि हितसंबंध आहेत. त्यामुळेच इराण आणि भारत या दोन्ही देशांमधील सहकार्याचा मार्ग तयार करण्यात यावा असे निर्देश इराणच्या सर्व अधिकाऱ्यांना आणि येथील दूतावासातील सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, असेही राजदूत फथली म्हणाले.

भारतावरील 'गॅस' संकट टळणार
Gas Cylinder: गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत होणार, महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय

तत्पूर्वी, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्रपती पेजश्कियान यांच्यात गुरुवारी रात्री उशिरा चर्चा झाली. त्याबाबतही त्यांनी माहिती दिली. दोन्ही नेत्यांमध्ये चांगली चर्चा झाली. शांततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत, असे दोन्ही नेत्यांना वाटते. इराणला युद्ध नको, पण वेळ आली तर, त्यासाठी संपूर्ण तयारी आहे, असे आम्ही आधीच म्हटले आहे, असेही ते म्हणाले.

आम्ही अमेरिकेसोबतही चर्चा करत आहोत. दुर्दैवाने चर्चा सुरू असतानाच त्यांच्याकडून हल्ले करण्यात आले. त्यामुळे चर्चेचा मार्ग बंद झाला. आम्हाला युद्ध नकोय, पण गरज पडली तर, आम्ही त्यासाठी तयार आहोत, असा पुनरुच्चारही इराणचे राजदूत फथली यांनी केला.

भारतावरील 'गॅस' संकट टळणार
Gas Cylinder : कमाल झाली...गॅस टंचाईच्या काळात हॉस्पिटलमधील सिलिंडरची चोरी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com