PM Narendra Modi : गंगा नदीवर पूजा, क्रूझ राईडचा आनंद; वाराणसीतून उमेदवारी अर्ज भरला

वाराणसी लोकसभा मतदारसंघासाठी १ जून रोजी मतदान होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीतून निवडणूक लढत असून, त्यांनी आज, उमेदवारी अर्ज भरला.
PM Narendra Modi in Varanasi
PM Narendra Modi in VaranasiANI
PM Narendra Modi Road Show
PM Narendra Modi Road ShowANI

देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विविध राज्यांतील अनेक मतदारसंघात आज उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत.

PM Narendra Modi welcome
PM Narendra Modi welcomeANI

वाराणसी लोकसभा मतदारसंघासाठी १ जूनला मतदान पार पडणार आहे. येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढत आहेत. त्यांनी आज उमेदवारी अर्ज भरला.

PM Narendra Modi
PM Narendra ModiANI

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतून उमेदवारी अर्ज भरलाय. येथून मोदी तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक लढत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याआधी मोदींनी रॅली काढली. या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं चित्र दिसून आलं.

PM Narendra Modi
PM Narendra ModiANI

मोदींनी अर्ज भरण्यापूर्वी वाराणसीमध्ये रोड शो झाला. रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी होती. त्यांचे सर्वत्र स्वागत करण्यात आले.

PM Narendra Modi
PM Narendra ModiANI

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नरेंद्र मोदी दशाश्वमेध घाटावर गेले. तिथे त्यांनी पूजा केली. यावेळी गंगा आरती केली आणि दुग्धाभिषेक घातला.

PM Narendra Modi
PM Narendra ModiANI

मोदींच्या स्वागतासाठी वाराणसी येथील दशाश्वमेध घाट सजावण्यात आला होता. विशेष म्हणजे मोदींनी क्रूझ राईडचाही आनंद घेतला.

PM Narendra Modi
PM Narendra ModiANI

वाराणसी लोकसभा मतदारसंघातून मोदी तिसऱ्यांदा मैदानात उतरले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com