Shocking : भयंकर! निवडणुकीदरम्यान ड्युटी बजावत होता पोलीस अधिकारी, छातीत दुखू लागलं अन्...

Kota Police Radheshyam Sankhla Dies : महापालिका निवडणुकीच्या बंदोबस्तादरम्यान कोटा पोलिस विभागातील ASI राधेश्याम सांखला यांना हृदयविकाराचा झटका आला. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
Kota Police Radheshyam Sankhla Dies Heart Attack
Kota Police Radheshyam Sankhla Dies Heart AttackSaam tv
Published On
Summary
  • महापालिका निवडणुकीच्या बंदोबस्तादरम्यान दुर्दैवी घटना

  • ड्युटीवर असताना हार्ट अटॅक येऊन ASI चा मृत्यू

  • पोलीस प्रशासनावर दुःखाचा डोंगर कोसळला

महापालिका निवडणुकीपूर्वी कोटा पोलिस विभागाला मोठा धक्का बसला आहे. आरके पुरम पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) राधेश्याम सांखला (वय ५२) यांचे गुरुवारी ड्युटीवर असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. निवडणूक बंदोबस्तासाठी ड्युटीवर असतानाच ही दुर्दैवी घटना घडली असल्याची माहिती आहे. या घटनेने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारपासून सांखलांवर निवडणूक ड्युटीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. गुरुवारी सकाळी ड्युटीवर असताना अचानक त्यांच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. सोबत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले, मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Kota Police Radheshyam Sankhla Dies Heart Attack
Gavar Side Effects : गवार खाणं 'या' लोकांसाठी ठरू शकत धोकादायक! 'ही' ६ कारणे वेळीच घ्या जाणून

सांखला यांच्या निधनाची बातमी पोलिस प्रशासनापर्यंत पोहोचताच संपूर्ण विभागात शोककळा पसरली. सहकाऱ्यांच्या आठवणीत सांखला हे नेहमी हसतमुख, मनमिळावू आणि सामाजिक स्वभावाचे अधिकारी होते. पोलिस सेवेत त्यांनी अनेक उल्लेखनीय कामगिरी केली होती. विशेष म्हणजे, ड्युटी बजावत असताना त्यांनी चंबळ नदी आणि कालव्यात बुडणाऱ्या तीन ते चार जणांचे प्राण वाचवले होते. त्यांच्या धाडसी आणि उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत त्यांना DGP Disc तसेच Gallantry Award ने सन्मानित करण्यात आले होते.

Kota Police Radheshyam Sankhla Dies Heart Attack
Ayurveda Benefits : सर्दी-खोकला झटक्यात नाहीसा, डिप्रेशनवरही मात;जाणून घ्या 'या' आयुर्वेदिक वनस्पतींचे फायदे

राधेश्याम सांखला हे १९९५ च्या बॅचचे पोलिस अधिकारी होते. कोटा शहरातील नयापुरा, दादाबाडी आणि आरके पुरम यांसह विविध पोलिस ठाण्यांमध्ये त्यांनी सेवा बजावली. ते बालाकुंड परिसरातील रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. मुलगा आणि एका मुलीचे लग्न झाले आहे. निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी कर्तव्य बजावत असताना एका कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याचा झालेला हा अचानक मृत्यू पोलिस विभागासाठी मोठी हानी मानली जात आहे. सहकाऱ्यांनी सांखला यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com