Kerala Exit Poll: केरळमध्ये कोणाचं सरकार येणार? भाजप, काँग्रेसचं काय होणार? एक्झिट पोलच्या अंदाजात भलतीच लाट

Kerala Exit Poll 2026 Update: केरळ विधानसभा निवडणुकीचा एक्झिट पोल समोर आला आहे. या एक्झिट पोलनुसार केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ आघाडी पुन्हा सत्तेवर येण्याची शक्यता आहे.
Kerala Exit Poll: केरळमध्ये कोणाचं सरकार येणार? भाजप, काँग्रेसचं काय होणार? एक्झिट पोलच्या अंदाजात भलतीच लाट
PM Modi and Rahul Gandhi Saam Tv
Published On

Summary -

  • केरळ विधानसभा निवडणुकीचा एक्झिट पोल समोर आला आहे

  • केरळमध्ये यूडीएफला आघाडी मिळण्याची शक्यता

  • एलडीएफकडून जोरदार टक्कर

  • भाजपची कामगिरी मर्यादित राहण्याचा अंदाज

केरळ विधानसभा निवडणुकीचा एक्झिट पोल समोर आला आहे. या एक्झिट पोलनुसार केरळच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. विविध संस्थांच्या एक्झिट पोलनुसार, केरळ राज्यात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ आघाडी पुन्हा सत्तेवर येण्याची शक्यता आहे. तर डाव्या लोकशाही आघाडीला (एलडीएफ) मोठा धक्का बसण्याची शक्यात आहे.

एक्झिट पोलनुसार, मॅट्रिक्सच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, यूडीएफला ७० ते ७५ जागा मिळतील, तर एलडीएफला ६०-६५ पर्यंत जागा मिळवण्यात यश मिळू शकते. पीपल्स पल्सच्या एक्झिट पोलनुसार, एलडीएफला ७५ ते ८५ जागा आणि यूडीएफला ५५ ते ६५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. इतर संस्थांच्या एक्झिट पोलमध्ये यूडीएफला आघाडीवर दाखवत आहेत.

Kerala Exit Poll: केरळमध्ये कोणाचं सरकार येणार? भाजप, काँग्रेसचं काय होणार? एक्झिट पोलच्या अंदाजात भलतीच लाट
Exit Polls: पाच राज्यांमध्ये कोणाचं सरकार येणार? ४ राज्यात भाजप तर एका राज्यात काँग्रेसची सत्ता, जाणून घ्या एक्झिट पोल

जेव्हीसी संस्थेच्या एक्झिट पोलनुसार, यूडीएफला ७२ ते ८४ जागा मिळू शकतात, तर एलडीएफला ५२ ते ६१ जागा मिळवण्यात यश येऊ शकते. 'ॲक्सिस माय इंडिया'च्या सर्वेक्षणानुसार यूडीएफला ७८ ते ९० जागांसह स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे. तर एलडीएफला ४९ ते ६२ जागा मिळवण्यात यश येईल. व्होटव्हाइबच्या एक्झिट पोलनुसार, यूडीएफला ७० ते ८० जागा मिळवण्यात यश येईल. तर एलडीएफ ५८ ते ६८ जागांवरच राहण्याची शक्यता आहे. पीमार्कूच्या आकडेवारीनुसार देखील यूडीएफ ७१ ते ७९ जागांसह आघाडीवर राहिल तर एलडीएफ ६२ ते ६९ जागा मिळवण्यात यश येईल.

Kerala Exit Poll: केरळमध्ये कोणाचं सरकार येणार? भाजप, काँग्रेसचं काय होणार? एक्झिट पोलच्या अंदाजात भलतीच लाट
Saam Exit Poll : ठाकरेंना धक्का की काँग्रेसची मुसंडी? १२ जिल्हा परिषदांच्या एक्झिट पोलची संपूर्ण आकडेवारी

पीपल्स इनसाइटच्या एक्झिट पोलनुसार, यूडीएफला ६६ ते ७६ जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ते बहुमताच्या जवळ किंवा किंचित पुढे जातील. दुसरीकडे, एलडीएफला ६३ ते ७१ जागा मिळण्याचा अंदाज आहे याचा अर्थ लढत खूपच अटीतटीची होऊ शकते. भाजपबद्दल बोलायचे झाल्यास, बहुतेक एक्झिट पोलनुसार त्यांची कामगिरी मर्यादित असल्याचे दिसून येते. भाजपला ० ते ७ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर इतर पक्षांनाही खूप कमी जागा मिळण्याचा अंदाज आहे. केरळमधील १४० जागांच्या विधानसभा निवडणुकीसाठी बहुमताचा आकडा ७१ आहे आणि बहुतेक एक्झिट पोलनुसार यूडीएफ हा आकडा ओलांडेल असे दिसून येत आहे.

Kerala Exit Poll: केरळमध्ये कोणाचं सरकार येणार? भाजप, काँग्रेसचं काय होणार? एक्झिट पोलच्या अंदाजात भलतीच लाट
पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता; ममतांना झटका; EXIT POLL च्या अंदाजामुळं देशाच्या राजकारणात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com