Crime: दारू पाजली, अश्लील व्हिडीओ दाखवले; आईने लेकीला बॉयफ्रेंडसोबत शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडलं

Kerala Crime: केरळमध्ये एका महिलेने आपल्या मुलीला दारू पाजली आणि बॉयफ्रेंडसोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. या महिलेला आणि तिच्या बॉयफ्रेंडला पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
Crime: दारू पाजली, अश्लील व्हिडीओ दाखवले; आईने लेकीला बॉयफ्रेंडसोबत शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडलं
Film Producer ArrestedSaam Tv
Published On

केरळमध्ये भयंकर घटना समोर आली आहे. याठिकाणी विशेष पोक्सो न्यायालयाने एका महिलेला आणि तिच्या बॉयफ्रेंडला १८० वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या तरुणाने महिलेच्या १२ वर्षांच्या मुलीवर वारंवार बलात्कार केला. यासाठी महिलेने तिच्या बॉयफ्रेंडला मदत केल्याचा आरोप आहे. महिलेने तिच्या अल्पवयीन मुलीला तिच्या बॉयफ्रेंडसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले आणि तिला दारू देखील पाजली, अशी माहिती सरकारी वकिलाने न्यायालयात दिली.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, न्यायालयाने महिला आणि तिच्या बॉयफ्रेंडला १८० वर्षांची शिक्षा सुनावली आणि १.१७ लाख रुपयांचा दंड ठोठावला. सुनावणीदरम्यान न्यायाधीश अशरफ एएम यांनी असे सांगितले की, दोघेही पोक्सो कायदा, भारतीय दंड संहिता आणि बाल न्याय कायद्याच्या विविध तरतुदींनुसार दोषी आहेत. आरोपी तरुण पलक्कडचा रहिवासी आहे. तर आरोपी महिला तिरुवनंतपुरमची रहिवासी आहे.

Crime: दारू पाजली, अश्लील व्हिडीओ दाखवले; आईने लेकीला बॉयफ्रेंडसोबत शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडलं
Crime: अडीच वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, ८० वर्षांच्या वृद्धाचं संतापजनक कृत्य; धुळे हादरले

विशेष सरकारी वकील सोमसुंदरन ए यांनी सांगितले की, ही ३० वर्षी महिला तिच्या पती आणि मुलीसह तिरुवनंतपुरममध्ये राहत होती. यादरम्यन ती ३३ वर्षीय आरोपीच्या संपर्कात आली. त्यानंतर ती त्याच्यासोबत पळून गेली आणि दोघेही पलक्कड आणि मलप्पुरममध्ये एकत्र राहत होते. बॉयफ्रेंडसोबत राहत असताना या महिलेने आपल्या मुलीला देखील घेऊन गेली होती.

Crime: दारू पाजली, अश्लील व्हिडीओ दाखवले; आईने लेकीला बॉयफ्रेंडसोबत शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडलं
Mumbai Crime : बनावट पोलीस अधिकाऱ्याचा कारनामा; अख्खी हॉटेल इंडस्ट्री हादरली होती, असा अडकला जाळ्यात

सरकारी वकिलांनी सांगितले की, महिलेच्या जोडीदाराने डिसेंबर २०१९ ते नोव्हेंबर २०२० दरम्यान मुलीवर अनेक वेळा बलात्कार केला. हे डिसेंबर २०२० ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत चालू राहिले. मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यासाठी बॉयफ्रेंडला मदत करणाऱ्या आईला दोषी ठरवण्यात आले आहे. आरोपी आई गुन्ह्याची साक्षीदार होती आणि तिने अल्पवयीन मुलीला लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडत होती आणि ती ते पाहत होती.

Crime: दारू पाजली, अश्लील व्हिडीओ दाखवले; आईने लेकीला बॉयफ्रेंडसोबत शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडलं
Pune Crime: पुणे हादरले! दिवसाढवळ्या रक्तरंजित थरार, तिघांनी धारदार शस्त्राने वार करत तरुणाला संपवलं

महिलेवर मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवल्याचा आणि तिला बिअर पाजल्याचा देखील आरोप होता. महिलेने मुलीला धमकी दिली की तिच्या डोक्यात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला आहे आणि जर तिने हे कोणाला सांगितले तर ते आम्हाला कळेल. या घटनेमुळे केरळमध्ये खळबळ उडाली आहे. आरोपी महिला आणि तिच्या बॉयफ्रेंडला पोलिसांनी अटक केली असून या दोघांना आता तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Crime: दारू पाजली, अश्लील व्हिडीओ दाखवले; आईने लेकीला बॉयफ्रेंडसोबत शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडलं
Kalyan Crime News : आईच्या कुशीतून हिसकावलं ८ महिन्यांचं बाळ, अन् मग... कल्याणमधील धक्कादायक प्रकार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com