Kalyan Crime News : आईच्या कुशीतून हिसकावलं ८ महिन्यांचं बाळ, अन् मग... कल्याणमधील धक्कादायक प्रकार

Kalyan Crime News : कल्याणमध्ये तरुणाने आईच्या कुशीतून ८ महिन्याचं बाळ पळवलं. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला अवघ्या सहा तासांत पकडलं आणि बाळ सुखरूप आई-वडिलांकडे सुपूर्द केलं.
Kalyan Crime News : आईच्या कुशीतून हिसकावलं ८ महिन्यांचं बाळ, अन् मग... कल्याणमधील धक्कादायक प्रकार
Kalyan Crime NewsSaam Tv
Published On
Summary

कल्याणमध्ये ८ महिन्याचं बाळ आईच्या कुशीतून पळवलं

आरोपी अक्षय खरे आणि त्याची आत्या सविता खरे अटकेत

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने सहा तासांत बाळाची सुटका केली

बाळ सुखरूप आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आलं

संघर्ष गांगुर्डे, कल्याण प्रतिनिधी

आई मुलाचं नातं इतकं घट्ट असत की आईच्या कुशीतून एक क्षणही आपलं बाळ इतरत्र गेलं तरी आईचा जीव कासावीस होतो. अशीच एक कल्याणमधून धक्कदायक बातमी समोर आली आहे. एका तरुणाने आठ महिन्याच्या बाळाला त्याच्या आईच्या कुशीतून पळवल्याची अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. हा सगळा प्रकार कल्याण रेल्वे स्थानकाच्या परिसरात घडला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला काही तासातच बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, निलेश पोंगरे आणि त्यांची पत्नी पूनम पोंगरे हे दाम्पत्य पुणे येथे राहत होते . पुण्याहून हे कुटुंब कल्याणला आले होते. कल्याणच्या पुलावर पती पत्नी आणि त्यांची तीन मुलं असे हे कुटुंब झोपले होते. या तीन मुलांमध्ये एक ८ महिन्यांच बाळ देखील होत. हे कुटुंब झोपले असताना एका तरुणाने संधी साधत महिलेच्या कुशीतून तिच्या ८ महिन्याच्या बाळाला अलगद उचललं. गाढ झोपेत असलेल्या या कुटुंबाला या घटनेचा थांगपत्ताही लागला नाही.

Kalyan Crime News : आईच्या कुशीतून हिसकावलं ८ महिन्यांचं बाळ, अन् मग... कल्याणमधील धक्कादायक प्रकार
Powai Hostage Case : पवईतील ओलिसनाट्य प्रकरणात चौकशीचा फास आवळला; सेलेब्रिटी कलाकारांसह बड्या राजकीय नेत्याची चौकशी होणार

थोड्या वेळाने महिलेला जाग येताच महिलेचा गोंधळ उडाला. महिलेला तिच्या कुशीत बाळ न दिसल्याने दाम्पत्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी गंभीर दखल घेत कल्याण महात्मा फुले पोलीस आणि कल्याण रेल्वे पोलीसानी तपासाची चक्रे फिरवली . याच दरम्यान महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सतीश सोनवणे यांनी सीसीटीव्ही पाहताच आरोपीला ओळखले .

Kalyan Crime News : आईच्या कुशीतून हिसकावलं ८ महिन्यांचं बाळ, अन् मग... कल्याणमधील धक्कादायक प्रकार
Badlapur News : निवडणुकीच्या घोषणेआधीच बदलापूरला मोठी भेट, २४० कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर, जीआर पण काढला

या आरोपीचे नाव अक्षय खरे असून काल मध्यरात्री सोनवणे यांनी अक्षय रस्त्यावर फिरत असताना त्याला हटकले होते. त्यावेळी अक्षयने घरी आत्याशी भांडण झाल्याने मी तक्रार करायला जातोय असे सांगितले.सोनवणे यांनी अक्षयला त्याच्या घरी नेऊन समज दिली होती. बाळाचे अपहरण करणारा हा अक्षयच असल्याचे सोनवणे यांच्या लक्षात आले. स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही तपासात आरोपीची ओळख पटवली. महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सोनवणे यांनी आरोपीला तत्काळ ओळखले त्याच्या घरी जाऊन तपासले असता बाळ त्याच्या घरी आढळले .

Kalyan Crime News : आईच्या कुशीतून हिसकावलं ८ महिन्यांचं बाळ, अन् मग... कल्याणमधील धक्कादायक प्रकार
Crime News : धाराशीवमध्ये रक्तरंजित थरार! रिक्षा चालकाची दिवसाढवळ्या हत्या, धक्कादायक कारण

पोलिसांनी अवघ्या सहा तासाच्या आत आरोपी अक्षय खरे आणि त्याची आत्या सविता खरे या दोघांना बेड्या ठोकल्या .बाळ सुखरूप त्याच्या आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आले .पोलिसांच्या प्रसंगावधनामुळे अवघ्या काही तासात बाळ पुन्हा आई वडिलांना मिळाले .दरम्यान अक्षयने बाळ का चोरले ,तो या बाळाला विकणार होता का ? याचा तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com