Ex गर्लफ्रेंडसोबत मरायचा प्लान आखला, कारमध्ये बसून बॉम्बस्फोट केला, तरुण जिवंत जळाला अन्..;

Karnataka Tumakuru Car Explosion Endlife Pact Case: कर्नाटकमधील तुमकुरूमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एक्स गर्लफ्रेंडसोबत आत्महत्या करण्याचा प्लॅन आखणाऱ्या तरुणाचा कार स्फोटात मृत्यू झाला, तर प्रेयसीने ऐनवेळी उडी मारून आपला जीव वाचवला.
Car engulfed in flames after a massive explosion on Tumakuru highway; boyfriend dies while girlfriend escapes moments before blast.
Car engulfed in flames after a massive explosion on Tumakuru highway; boyfriend dies while girlfriend escapes moments before blast.saam tv
Published On

कर्नाटकमधील तुमरूम जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलाने आपल्या एक्स गर्लफ्रेंडसोबत आत्महत्या करण्यासाठी गाडीत बॉम्बस्फोट घडवला. या घटनेत प्रियकराचा मृत्यू झाला. मात्र प्रेयसीने ऐनवेळी टॅक्सीतून उडी मारल्याने तिचा जीव वाचला. या घटनेत टॅक्सी चालकही गंभीररित्या भाजला आहे. प्रेयसी आणि चालक दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Car engulfed in flames after a massive explosion on Tumakuru highway; boyfriend dies while girlfriend escapes moments before blast.
भाजप खासदारांना कार्यक्रमातच चक्कर, तातडीने रुग्णालयात दाखल; माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष भेटीसाठी हॉस्पिटलमध्ये

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी सिरा तालुक्यात राष्ट्रीयमहामार्गावर घडली. प्रत्यक्षदर्शीनी सांगितले की, भरधाव वेगाने जाणारी कार अचानक थांबली आणि त्यातून एका मुलीने बाहेर उडी मारली. ती खूप घाबरली होती. कोणाला काही कळायच्या आतच कारमध्ये मोठा स्फोट झाला आणि कारला आग लागली. चालकाने देखील उडी मारून स्वतःचे प्राण वाचवले, मात्र प्रियकराचा जळून मृत्यू झाला, नागेंद्रन असे त्याचे नाव आहे.

Car engulfed in flames after a massive explosion on Tumakuru highway; boyfriend dies while girlfriend escapes moments before blast.
Kalyan Crime: पूजा पाठ करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, कल्याणमधील संतापजनक घटना

पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, नागेंद्रन आणि ती मुलगी रिलेशनशिपमध्ये होते. ती मुलगी एक ऑपरेशन्स टेक्निशियन आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये वाद सुरू होते. अलीकडेच, निराशेपोटी तिने नागेंद्रनला ब्लॉक केले होते. ब्लॉक केल्यामुळे संतापलेल्या नागेंद्रनने शनिवारी सकाळी तिच्या घरी जाऊन तिचे अपहरण केले आणि तिला टॅक्सीतून घेऊन गेला. जेव्हा ती मुलगी घरी सापडली नाही, तेव्हा तिच्या पालकांनी पोलिसांना माहिती दिली.

Car engulfed in flames after a massive explosion on Tumakuru highway; boyfriend dies while girlfriend escapes moments before blast.
Crime News: नवऱ्याकडून गर्भातील बाळाच्या DNA टेस्टची मागणी, ५ महिन्यांच्या गरोदर महिलेची आत्महत्या

दरम्यान, नागेंद्रनने तिला शहरातून बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. वाटेत त्याने तिच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा टॅक्सी चालकाने गाडी थांबवली, त्यामुळे ती मुलगी गाडीतून उडी मारून बाहेर पडली. पण तो बाहेर पडण्यापूर्वीच, नागेंद्रनने आपल्यासोबत आणलेली काही स्फोटके लावली आणि मोठ्या स्फोटात नागेंद्रन ठार झाला. सदर घटनेमुळे स्थानिक परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com