Crime नवऱ्याकडून गर्भातील बाळाच्या DNA टेस्टची मागणी, ५ महिन्यांच्या गरोदर महिलेची आत्महत्या

Hyderabad Pregnant Woman Dies by end life: हैदराबादमध्ये एका ५ महिन्यांच्या गरोदर महिलेने आत्महत्या केली. नवऱ्याने गर्भातील बाळाच्या डीएनए टेस्टची मागणी केल्यामुळे महिलेने टोकाचे पाऊल उचललं.
Crime नवऱ्याकडून गर्भातील बाळाच्या DNA टेस्टची मागणी, ५ महिन्यांच्या गरोदर महिलेची आत्महत्या
Hyderabad TragedySaam Tv
Published On
  • हैदराबादमध्ये ५ महिन्यांच्या गरोदर महिलेची आत्महत्या

  • नवऱ्याने गर्भातील बाळाच्या डीएनए टेस्टची मागणी केली होती

  • सुष्मितावर शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचा कुटुंबीयांचा आरोप

  • पोलिसांनी नवरा आणि सासूला अटक केली

हैदराबादमध्ये २३ वर्षीय गरोदर महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नवऱ्याने गर्भातील बाळाच्या डीएनए तपासणीची मागणी केली. त्यामुळ नाराज झालेल्या महिलेने टोकाचे पाऊल उचलत आयुष्य संपवलं. या घटनेमुळे हैदराबादमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्या केलेल्या महिलेचा नवरा आणि सासूविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, जी सुष्मिता असं आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव होते. मेडक जिल्ह्यातील अल्लादुर्ग मंडलातील गडीपेड्डापूर गावात ती कुटुंबीयांसोबत राहत होती. २४ जून रोजी सायंकाळी तिने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येमुळे माहेरकडच्यांना मोठा धक्का बसला. तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी केली.

Crime नवऱ्याकडून गर्भातील बाळाच्या DNA टेस्टची मागणी, ५ महिन्यांच्या गरोदर महिलेची आत्महत्या
Crime : नागपुरात थरार! घटस्फोटाचा निकाल लागताच २४ वर्षीय तरुणीची हत्या; भररस्त्यात गळा, पोटावर सपासप वार

विकाराबाद जिल्ह्यातील मोथकुपल्ली गावची रहिवासी असलेल्या सुष्मिताचे लग्न १८ महिन्यांपूर्वी गडीपेड्डापूर येथील बांगडी विक्रेता जी. अभिलाष याच्यासोबत झाले होते. आत्महत्या केली तेव्हा सुष्मिता ५ महिन्यांची गरोदर होती. सुष्मिताच्या आईने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांनी आरोप केला की, सुष्मिताचा नवरा तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होता.

Crime नवऱ्याकडून गर्भातील बाळाच्या DNA टेस्टची मागणी, ५ महिन्यांच्या गरोदर महिलेची आत्महत्या
Kalyan Crime: हॉटेलमध्ये ३ महिन्यांपासून सुरू होता वेश्या व्यवसाय, २ महिलांना नको त्या अवस्थेत पकडलं; प्रसिद्ध महिला वकिलाला अटक

सुष्मिताची आई जनाबाईंनी आरोप केला की, '२३ जून रोजी मी आणि माझा नवरा सुष्मिताच्या डोहाळेजेवणाच्या तयारीवर चर्चा करण्यासाठी सुष्मिताच्या घरी गेलो होतो. आम्ही तिथे असताना अभिलाषने सोहळ्यावरून वाद घातला आणि न जन्मलेल्या बाळाच्या डीएनए चाचणीची मागणी केली. यानंतर समाजातील वडीलधाऱ्यांनी हस्तक्षेप केला आणि आम्ही घरी परत आलो.

Crime नवऱ्याकडून गर्भातील बाळाच्या DNA टेस्टची मागणी, ५ महिन्यांच्या गरोदर महिलेची आत्महत्या
Delhi Crime: दिल्ली हादरली! १० वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या, मृतदेह जंगलात नेऊन फेकला

त्या अपमानजनक अनुभवानंतर दोन दिवसांनी २५ जूनच्या संध्याकाळी सुष्मिताने गडीपेड्डापूर येथील तिच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गावकऱ्यांनी तिच्या आई-वडिलांना ही माहिती दिली. पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत जनाबाईंनी असाही आरोप केला आहे की, नवरा आणि सासूच्या सततच्या छळामुळे त्यांच्या मुलीचा जीव गेला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकल्या. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Crime नवऱ्याकडून गर्भातील बाळाच्या DNA टेस्टची मागणी, ५ महिन्यांच्या गरोदर महिलेची आत्महत्या
Crime: बायको अन् २ मुलांची हत्या, नंतर तरुणाने धावत्या ट्रेनसमोर उडी मारत संपवलं आयुष्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com