Kalyan Crime: पूजा पाठ करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, कल्याणमधील संतापजनक घटना

Fake Baba Misbehaves With Minor Girl: राज्यभर गाजत असलेल्या भोंदू बाबा प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर ही घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. पूजा पाठ करण्याच्या बहाण्याने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.
SHOCKING! FAKE BABA BOOKED FOR ASSAULTING MINOR GIRL IN KALYAN
SHOCKING! FAKE BABA BOOKED FOR ASSAULTING MINOR GIRL IN KALYAN
Published On
Summary
  • कल्याणमध्ये भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा आरोप.

  • पूजा पाठाच्या बहाण्याने आरोपीने केला गैरवापर.

  • ७८ वर्षीय साहिद शेखविरोधात खडकपाडा पोलिसांत गुन्हा दाखल.

संघर्ष गांगुर्डे,साम प्रतिनिधी

संपूर्ण राज्यात भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण गाजत असताना कल्याण मध्येही एका भोंदू बाबाचे काळे कारनामे समोर आले आहेत.कल्याणमध्ये पूजा पाठ करण्याच्या बहाण्याने ७८ वर्षाच्या भोंदू बाबाने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी भोंदू बाबा साहिद शेखविरोधात खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

SHOCKING! FAKE BABA BOOKED FOR ASSAULTING MINOR GIRL IN KALYAN
Crime: अपहरण करून तरुणीवर ५ जणांकडून सामूहिक बलात्कार, अश्लिल व्हिडीओ बनवून ब्लॅकमेलिंग

हाती आलेल्या माहितीनुसार, पीडितेची आजी आणि वडील काही महिन्यापूर्वी मरण पावले होते. याची भीती दाखवत घरावर भूतबाधा असून ती दूर करावी लागेल. ही बाधा दूर करण्यासाठी पूजा करणं गरजेचे आहे, असे सांगून ७८ वर्षाच्या भोंदू बाबाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. या प्रकरणी उल्हासनगर मध्ये राहत असलेल्या भोंदू बाबा साहिद शेखविरोधात खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SHOCKING! FAKE BABA BOOKED FOR ASSAULTING MINOR GIRL IN KALYAN
Shocking : धक्कादायक! आईला बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं, संतापलेल्या मुलानं उचललं भयंकर पाऊल

भोंदू बाबा साहिद शेख याने पीडित मुलीच्या आईला सांगितले की, घरातील बाधा दूर होऊन शांतता नांदेल. पण त्यासाठी पूजा पाठ करावी लागेल, त्यानंतर पीडितेच्या आईने पूजा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भोंदू बाबा २ मे ला पीडितेच्या घरी आला. काही पूजा केल्यानंतर १५ वर्षीय मुलीला तोकड्या कपड्यात आपल्या समोर बसण्यास सांगितले. यानंतर मुलीला स्पर्श करत तिचा विनयभंग केला. घाबरलेल्या पीडितेने याबाबत आधी कोणालाच सांगितलं नाही. पूजेच्या नावाखाली साहिद याने पुन्हा ६ मे रोजी मुलीची आई घरात नसताना या मुलीचे घर गाठत लगट करण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर घाबरलेल्या मुलीने आई घरी येताच हा सर्व प्रकार सांगितला. आईने मुलीसह खडकपाडा पोलिस ठाणे गाठत साहिद शेख विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करत या भोंदू बाबाला बेड्या ठोकल्या आहेत.या प्रकरणाचा तपास खडकपाडा पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com