Shocking : धक्कादायक! आईला बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं, संतापलेल्या मुलानं उचललं भयंकर पाऊल

Uttar Pradesh Crime News : उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे आईच्या प्रियकराची मुलाने काकाच्या मदतीने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्यानंतर संतप्त झालेल्या मुलाने चाकू आणि विटांनी हल्ला करून खून केला.
SON KILLS MOTHER’S BOYFRIEND IN UTTAR PRADESH | SHOCKING BIJNAUR MURDER CASE
SON KILLS MOTHER’S BOYFRIEND IN UTTAR PRADESH | SHOCKING BIJNAUR MURDER CASESaam Tv
Published On
Summary
  • उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये आईच्या प्रियकराची निर्घृण हत्या

  • मुलाने काकाच्या मदतीने आखला खूनाचा कट

  • पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींना अटक केली

  • चाकू आणि विटांनी हल्ला करून तरुणाची हत्या करण्यात आली

उत्तर प्रदेशमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणाने बिजनौर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पीजीआयमध्ये आपल्या आईच्या प्रियकराची निर्घृण हत्या केली आहे. आईला बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पाहिल्याने हा तरुण संतापलेला. संतापाच्या भरात त्याने काकाच्या मदतीने आईच्या प्रियकराला संपवलं असल्याचे उघड झाले आहे. मृत तरुणाचे नाव सूरज कुमार गौतम असे आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी असलेल्या महिलेच्या तरुणासह त्याच्या अल्पवयीन काकाला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अशरफनगर-इठुरिया परिसरातील डेरहवा येथे राहणारा सूरज कुमार गौतम याचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह शनिवारी सकाळी एका रिकाम्या प्लॉटमध्ये आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. डीसीपी अमित कुमार आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकांनी परिसरातील ५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये दोन संशयित तरुण घटनास्थळावरून पळून जाताना दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही अटक केली.

SON KILLS MOTHER’S BOYFRIEND IN UTTAR PRADESH | SHOCKING BIJNAUR MURDER CASE
Shocking : कोचिंग क्लासमधील शिक्षकाचं भयंकर कांड, हॉटेलमध्ये विद्यार्थिनीवर केला बलात्कार; आता २० वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

पोलिस चौकशीत आरोपीने धक्कादायक खुलासा केला. त्याच्या आईचे मृत सूरजसोबत मागील तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सुमारे दोन महिन्यांपूर्वी आरोपीने सूरजला आपल्या आईसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. त्यावेळी त्याने सूरजला घरात येण्यास मनाई केली होती. मात्र, सूरजचे येणे-जाणे सुरूच राहिल्याने आरोपीच्या मनात संताप वाढत गेला. समाजात बदनामी होईल या भीतीतून त्याने सूरजचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.

SON KILLS MOTHER’S BOYFRIEND IN UTTAR PRADESH | SHOCKING BIJNAUR MURDER CASE
Kitchen Hack : उन्हाळ्यात मडक्यातलं पाणी पिताय? थांबा! त्यापूर्वी 'हे' आधी करा

यासाठी आरोपीने आपल्या काकालाही सोबत घेतले. शुक्रवारी रात्री आरोपीने सूरजला फोन करून बोलावले आणि दारू पिण्याचा प्लॅन केला. तिघेही एका निर्जन ठिकाणी बसून मद्यपान करत होते. आरोपींनी मुद्दाम सूरजला जास्त दारू पाजली. सूरज पूर्णपणे नशेत गेल्यानंतर आरोपीने आधीपासून लपवून ठेवलेल्या धारदार चाकूने त्याच्या चेहऱ्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेला सूरज पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना तो काही अंतरावर कोसळला. त्यानंतर दोघांनीही त्याच्या डोक्यावर चाकूने आणि विटांनी वार करून त्याची हत्या केली. पोलिसांनी घटनास्थळावरून हत्येसाठी वापरलेले शस्त्र आणि विटा जप्त केल्या असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com