महिला उपनिरीक्षक अपर्णा जाधव यांना लाच मागितल्याप्रकरणी अटक
आरोपीला मदत आणि जामिनासाठी २५ हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप
अपर्णा जाधव यांचं निलंबन
प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.
कोल्हापूरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलिस उपनिरीक्षक अपर्णा सुखदेव जाधव यांच्याविरोधात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्यावर तातडीने कारवाई करत तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिस दलातील एका महिला अधिकाऱ्याने आपल्या पतीविरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली होती. नागाळा पार्क परिसरातील फ्लॅटमध्ये झालेल्या या घटनेनंतर संबंधित पतीविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक अपर्णा जाधव यांच्याकडे होता. तपासादरम्यान जाधव यांनी संशयिताला मदत करण्यासाठी तसेच त्याच्या जामिनाच्या प्रक्रियेत मदत करण्याच्या मोबदल्यात २५ हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीही त्यांच्या वडिलांकडून जाधव यांनी २५ हजार रुपये घेतले होते. याबाबतचे काही पुरावे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देण्यात आले. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २२ जुलै रोजी शाहूपुरी पोलिस ठाण्यात सापळा रचला होता. मात्र, कारवाईची माहिती मिळाल्याचा संशय आल्याने अपर्णा जाधव यांनी प्रत्यक्ष रक्कम स्वीकारली नाही.
तरीही चौकशीत लाचेची मागणी केल्याचे आणि यापूर्वी रक्कम स्वीकारल्याचे निष्पन्न झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, लाच मागितल्याचा गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी अपर्णा जाधव यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.