म्हैसूरच्या हिनाकल येथे महिला कार्मचारीची आत्महत्या
कामाच्या ठिकाणी मानसिक छळ होत असल्याचा आरोप
सलग चार महिने साप्ताहिक सुट्टी न मिळाल्याचा आणि एमर्जन्सीमध्येही रजा नाकारल्याचा आरोप
पोलिसांनी सुसाइड नोटमधील आरोपांची तपासणी सुरू केली
कर्नाटकातील म्हैसूर येथे कामाच्या ठिकाणी होत असलेल्या कथित मानसिक छळाला कंटाळून एका महिलेने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागेश्वरी असे मृत महिलेचे नाव असून ती हिनाकल येथील एका नामांकित कंपनीत प्रॉडक्ट्सची प्रमोटर म्हणून काम करत होती. एका मार्केटिंग कंपनीमार्फत तिची नियुक्ती करण्यात आली होती.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, गेल्या सुमारे १५ दिवसांपासून नागेश्वरी मानसिक तणावाखाली होती. कामाच्या ठिकाणी आपल्याला त्रास दिला जात असल्याचे तिने आपल्या कुटुंबीयांना सांगितले होते. त्यानंतर तिची मानसिक अवस्था अधिकच खालावल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
पोलिसांना मिळालेल्या सुसाइड नोटमध्ये नागेश्वरीने काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच स्वतःची कोणतीही चूक नसतानाही काही प्रकरणांमध्ये आपल्याला टार्गेट करून त्रास दिला जात असल्याचे तिने म्हटले आहे. सलग चार महिने आठवड्यातून एकही सुट्टी देण्यात आली नाही, असा आरोपही तिने केला आहे. एमर्जन्सीमध्ये सुट्टी मागितल्यानंतरही परवानगी मिळत नसल्याचे तिने लिहिले होते.
नोकरीतून काढून टाकण्यात आल्याचा उल्लेखही सुसाइड नोटमध्ये असल्याचे समोर आले आहे. डॉली नावाच्या सुपरवायझरकडून आपल्याला त्रास दिला जात असल्याचा आरोप नागेश्वरीने केला आहे. नागेश्वरीची आई रत्नम्मा यांनी मुलीला न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली असून सुसाइड नोटमधील आरोपांचीही तपासणी केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.