Crime news: हॉस्टेलमध्ये १५ वर्षाच्या मुलीवर गँगरेप, रुम दाखवण्याच्या बहाण्याने ५ तास अत्याचार

Kanpur Minor Assault Case: कानपूरमधील एका हॉस्टेलमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे.
Kanpur Minor Assault Case
Kanpur Minor Assault Casesaam tv
Published On

कानपूरच्या बिठूर परिसरात एक भीषण आणि धक्कादायक घटना घडली आहे. वाराणसीतील अवघ्या १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर हॉस्टेलमध्ये तीन युवकांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक बाब समोर आलीये. शनिवारी पीडित मुलीने अपर सिव्हिल जज यांच्या न्यायालयात घडलेल्या घटनेची माहिती दिली.

हॉस्टेलमध्ये बंधक ठेवून केले अत्याचार

मंगळवारी रात्री सुमारे बारा वाजता पदम त्रिपाठी नावाच्या युवकाने रूम मिळवून देण्याच्या बहाण्याने मुलीला मंधना परिसरातील हॉस्टेलमध्ये नेलं. तिथे पोहोचताच त्याने निहाल सिंह आणि नितेश दुबे उर्फ बिल्लू यांना बोलावून घेतलं. यावेळी तिघांनी मिळून मुलीला तब्बल पाच तास बंधक ठेवून तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती आहे. त्यानंतर तिला खोलीत सोडून आरोपी फरार झाले.

Kanpur Minor Assault Case
दिल्ली हादरली! आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय; भाच्याने मामाला संपवलं

दुसऱ्या दिवशी सकाळी मुलीची अवस्था पाहून हॉस्टेलमधील एका तरूणाने या घटनेची पोलिसांना माहिती दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि पदम त्रिपाठीला अटक करून त्याची तुरूंगात रवानगी करण्यात आली आहे. याशिवाय त्याचे दोन साथीदार निहाल सिंह आणि नितेश दुबे यांना ५५ तासांच्या आत पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.

Kanpur Minor Assault Case
Kolhapur : केस ओढले, गळा आवळला, लाथाबुक्यांनी मारलं; घराच्या वाटणीवेळी तुंबळ हाणामारी|Video Viral

न्यायालयात साक्ष देताना मुलीने स्पष्ट सांगितलं की, पदम त्रिपाठीने तिला खोलीत नेलं आणि त्यानंतर तिघांनी मिळून तिच्यावर अत्याचार केला. मुलीच्या सांगण्याने संपूर्ण प्रकरणाची पुष्टी झाली.

Kanpur Minor Assault Case
Crime News: श्रद्धा वालकर हत्याकांडची पुनरावृत्ती; फ्रिजमध्ये सापडले मोनिकाच्या शरिराचे तुकडे, पोलीस शिराच्या शोधात

सध्या तिन्ही आरोपींना तुरुंगात पाठवण्यात आलं असून पोलीस तपास अंतिम टप्प्यात आहे. यासंदर्भात लवकरच चार्जशीट दाखल होणार असल्याचं पोलीसांकडून सांगण्यात आलं आहे. या घटनेनंतर पीडितेला सुरक्षा आणि काऊंसिलिंगची व्यवस्था करून देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com