Crime News: श्रद्धा वालकर हत्याकांडची पुनरावृत्ती; फ्रिजमध्ये सापडले मोनिकाच्या शरिराचे तुकडे, पोलीस शिराच्या शोधात

Visakhapatnam Crime News: श्रद्धा वालकर प्रकरणासारखेच विशाखापट्टणममध्ये हत्येचे प्रकरण घडले आहे. यात फ्रिजमध्ये शरीराचे अवयव सापडले आहेत.
Visakhapatnam Crime News:
Visakhapatnam Crime News:
Published On
Summary
  • विशाखापट्टणमध्ये धक्कादायक हत्या प्रकरण

  • मृतदेहाचे तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले

  • शीर अद्याप बेपत्ता, पोलिसांचा शोध सुरू

दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडाप्रमाणेच विशाखापट्टणमध्येही घटना घडली. येथील एका विवाहित ३५ वर्षीय व्यक्तीनं आपल्या २८ वर्षाच्या प्रेयसीची हत्या केली असून तिच्या शरीराचे तुकडे करून ते फ्रिजमध्ये ठेवले होते. पोलिसांना फ्रिजमध्ये शीर नसलेला मृतदेह छिन्नविछन्न अवस्थेत आढळला होता. पोलसांना अद्याप शीर सापडले नाहीये.

दरम्यान आरोपीची ओळख नौदल कर्मचारी सी. एच. रविंद्र अशी पटली आहे. तर मृत मुलीचं नाव मोनिका असून ती विजयनगरम जिल्ह्यातील राजम येथील होती. मोनिकाची हत्या विझागच्या एल.व्ही. नगर परिसरात घडली होती. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आरोपीने मोनिकाच्या शरीराचे काही अवयव नष्ट केले, तर काही फ्रिजमध्ये लपवले होते.

Visakhapatnam Crime News:
दिल्ली हादरली! आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय; भाच्याने मामाला संपवलं

हाती आलेल्या माहितीनुसार,रविंद्र हा विवाहित होता, तरी त्याचे मोनिकाशी प्रेमसंबंध होते. काही दिवसापुर्वीच रविंद्रची पत्नीनं त्याला सोडलं होतं. तर २९ मार्च रोजी मोनिका त्याच्या घरी राहायला आली होती. खु्द्द रविंद्रने मोनिकाला कॉल करून आपल्या घरी बोलवलं होतं. ते काही वेळे घरात होते. त्याचदरम्यान त्या दोघांमध्ये भांडण झालं. दरम्यान पोलिासांनी अद्याप त्यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही नाहीये.

Visakhapatnam Crime News:
Crime News: पुणे हादरलं! ३ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; पीडितेच्या आई-वडिलांना दिली जीवे मारण्याची धमकी

परंतु रविंद्रने रागाच्या भरात मोनिकाची हत्या केली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने मोनिकाच्या शरीराचे तुकडे केले. काही तुकडे बॅगमध्ये भरून ते फेकून दिले. तर शरीराचे काही तुकडे फ्रिजमध्ये भरले. मोनिका हत्याकांडाबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, हत्येनंतर रविंद्र पोलीस ठाण्यात आला. त्याने हत्येची कबुली दिली. तपासादरम्यान पोलिसांनी रविंद्रच्या घरातून महिलेच्या शरीराचे काही अवयव जप्त केले. मात्र मुंडकं गायब होते. रविंद्रने ते कुठेतरी टाकून दिले असावे, असा पोलिसांना संशय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com