

झारखंड विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर CGL आणि TDPL परीक्षा रद्द
हेमंत सोरेन यांनी CGL आणि TDPL परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली
रांचीतील विद्यार्थी आंदोलनाचा मोठा विजय
झारखंडची राजधानी रांचीमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय झालाय. TDPL द्वारे घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षा रद्द केल्या जातील. तसेच, CGL परीक्षाही रद्द करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सोमवारी रात्री केलीय. JSSC-CGL परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री सोरेन यांनी खुद्द दिलीय. २०१४ पासून झालेल्या सर्व त्रुटींची मग त्या लहान असोत किंवा मोठ्या त्यांची चौकशी केली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर रांचीमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "टीडीपीएल (TDPL) द्वारे घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा रद्द केल्या जात आहेत. सुधारणांची अंमलबजावणी करण्यासाठी आयएएस अधिकारी अमिताभ कौशल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. तसेच, १४ व्या जेपीएससी (JPSC) बाबतचा प्रश्न आमच्या मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत सोडवण्यात आलाय. या प्रकरणाला अंतिम स्वरूप देण्यासाठी आम्ही आज मंत्रिमंडळाची बैठक घेतली.
TDPL द्वारे घेण्यात आलेल्या परीक्षा, TDPL द्वारे करण्यात आलेली भरती आणि TDPL द्वारे हाती घेण्यात आलेले इतर सर्व उपक्रम रद्द करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. परीक्षा कशा घेतल्या जाव्यात किंवा कशा घेतल्या जाऊ नयेत, याविषयीची प्रमाणित कार्यपद्धती (SOP) आधीच अस्तित्वात आहे. जर त्या कार्यपद्धतीचे पालन केले गेले असते, तर अनियमितता घडल्या नसत्या. यानुसार TDPL ने जाहीर केलेले निकाल आणि TDPL चे सर्व गोष्टी रद्द करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत.
मिळालेल्या माहितीनुसार, झारखंड सरकारच्या मंत्रिमंडळाने 'टीएसआर डेटा प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड' (TSR Data Processing Private Limited) या आउटसोर्सिंग एजन्सीमार्फत २०१४ पासून घेण्यात आलेल्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सुद्धा सरकारनं घेतलाय. याबाबत बोलताना झारखंड सरकारचे मंत्री इरफान अन्सारी म्हणाले, "सरकारने विद्यार्थ्यांची मुख्य मागणी म्हणजेच CGL परीक्षा रद्द करण्याची मागणी मान्य केली आहे. यावर एकमत झाले आहे. तसेच, TDPL द्वारे घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षा रद्द केल्या जातील."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.