ही व्हिडिओ दिल्लीच्या जंतरमंतरची नाही...हा लाठीचार्ज झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरचा...झारखंडमध्ये JPSC आणि JSSC परीक्षांमधील अनियमिततेविरोधात गेल्या 15 दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु होते...JSSC-CGL परीक्षा रद्द करून या परीक्षांमधीस अनियमिततेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी झारखंडमधील विद्यार्थी आंदोलकांनी केली होती...मात्र 15 दिवस उलटूनही सरकारनं ठोस भूमिका न घेतल्यानं विद्यार्थी अखेर विधानसभेवर धडक मोर्चा काढला..गेल्या 9 दिवसांपासून आमरण उपोषणावर असलेल्या देवेंद्रनाथ महतो यांनी तर थेट स्ट्रेचरवरच विधानसभेकडे कूच केली...
मात्र झारखंडमध्ये दिल्लीतील आंदोलनाची पुनरावृत्ती पाहायला मिळालीय.....एकीकडे बॅरिकेड्स आणि तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी झारखंड विधानभवन परिसरात जाण्याचा प्रयत्न करत होते.. मात्र त्याचवेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर कुठे पाण्याचा फवारा मारून रोखण्याचा प्रयत्न केला तर कुठे अश्रूधुराचा वापर करून परिस्थिती हातळण्यात आली...मात्र दिल्लीतील आंदोलनाप्रमाणेच पोलिसांनी झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज केल्यानं विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय...
मुळात या आंदोलनाआधी झारखंड सरकारनं जेपीएससी-पीटी परीक्षा रद्द करण्यासह विद्यार्थ्यांच्या 98 टक्के मागण्या मान्य केल्याचा दावा केला होता...मात्र JSSC-CGL परीक्षा रद्द करण्यासंदर्भात आणि सीबीआय चौकशीसंदर्भात कुठलीच ठोस भूमिका न घेतल्यानं विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत...त्यातच झारखंड लोकसेवा आयोगातील तीन सदस्यांनी राजीनामा दिल्यानं JPSC परिक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप आंदोलकांनी केलीय...
दरम्यान जेएसएससी-सीजीएल परीक्षा पूर्णपणे रद्द होत नाही आणि या प्रकरणाची सीबीआय चौकशीचे आदेश मिळत नाहीत, तोपर्यंत माघार घेण्यास विद्यार्थी तयार नाहीत. त्यामुळे येत्या काळात झारखंड सरकारपुढील आव्हानं आणखी वाढण्याच्या शक्यता आहेत...मात्र फक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांचे राजीनामा घेऊन परिक्षांमधील अनियमितेची जबाबदारी झारखंडमधील शिक्षण मंत्री झटकणार की विद्यार्थी आंदोलक झारखंडमधील शिक्षण मंत्री सुदिव्य कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणार..हे पाहणं महत्त्वाचं आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.