Japan Earthquake: जपानमध्ये मोठा भूकंप, ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के; त्सुनामीचा इशारा

Major Quake Jolts Northern Japan: जपानमध्ये मोठा भूकंप झाला. जपामध्ये ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
Japan Earthquake: जपानमध्ये मोठा भूकंप, ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के; त्सुनामीचा इशारा
Japan Earthquakesaam tv
Published On

Summary -

  • जपानमध्ये ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

  • भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा जारी

  • किनारपट्टीवरील नागरिकांना स्थलांतराचे आदेश देण्यात आले

जपानमध्ये मोठा भूकंप झाला. सोमवारी सकाळी जपानच्या उत्तर भागामध्ये ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. यानंतर जपान हवामान विभागाने त्सुनामीचा इशारा जारी केला आहे. किनारपट्टीजवळ राहणाऱ्या नागरिकांनी तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्सुनामी येणार असल्यामुळे सरकार अलर्ट मोडवर आले असून विशेष पथकं तयार करण्यात आल्याचे पंतप्रधान कार्यालयाने सांगितले. यापूर्वी २०११ मध्ये जपानमध्ये ९.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्यावेळी १८००० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला होता.

जपानच्या हवामान विभागाने सांगितले की, उत्तर जपानमध्ये भूकंप झाला. या धक्क्यामुळे त्सुनामी येण्याची शक्यता आहे. समुद्र खवळला असून लाटांची उंची १० फुटांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. स्थानिक वेळेनुसार दुपारी ४:५३ वाजता भूकंप झाला. उत्तर इवाते प्रांताच्या पॅसिफिक महासागर परिसरात झालेल्या या भूकंपाचे धक्के दूरपर्यंत जाणवले. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की शेकडो किलोमीटर दूर असलेल्या टोकियोमधील मोठ्या इमारतीदेखील हादरल्या.

Japan Earthquake: जपानमध्ये मोठा भूकंप, ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के; त्सुनामीचा इशारा
Earthquake: दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्याने हादरला, नागरिक घाबरून घराबाहेर पळाले; VIDEO समोर

भूकंपाच्या धक्क्यामुळे जपानमधील नागरिक प्रचंड घाबरले आहेत. भूकंपाचे धक्के जाणवताच सर्वजण घराबाहेर पळाले. या भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. त्सुनामीच्या लाटा अल्पावधीतच उत्तर किनारपट्टीवर पोहोचू शकतात, असे हवामान विभागाने सांगितले आहे.

Japan Earthquake: जपानमध्ये मोठा भूकंप, ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के; त्सुनामीचा इशारा
Palghar Earthquake: पालघरमध्ये भूकंपाचे धक्के; जेवणाच्यावेळी जमीन हादरली

समुद्र किनारी आणि नदीच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांनी तात्काळ परिसर सोडावा आणि उंच ठिकाणि किंवा सुरक्षित इमारतीसारख्या ठिकाणी जावे असे आवाहन केले जात आहे. त्सुनामीच्या लाटांमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते. त्यामुळे जोपर्यंत इशारा मागे घेतला जात नाही तोपर्यंत नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

Japan Earthquake: जपानमध्ये मोठा भूकंप, ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के; त्सुनामीचा इशारा
Palghar Earthquake: पालघरमध्ये भूकंपाचे धक्के; जेवणाच्यावेळी जमीन हादरली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com