देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे. काही दिवसांपूर्वी काश्मीरपर्यंत थेट वंदे भारत सुरू करण्यात आली होती. आता जम्मू काश्मीरमधील प्रवाशांसाठी आणखी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. जम्मू तवी ते श्रीनगर दरम्यान तिसरी वंदे भारत एक्स्प्रेसह सुरू होणार असून ती शहीद कॅप्टन तुषार महाजन उधमपूरमार्गे धावणार आहे.
या नव्या वंदे भारत एक्स्प्रेसला रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजूरी दिली आहे. या गाडीचा क्रमांक 26407/26408 असा असेल. जम्मू तवी ते श्रीनगरदरम्यान धावणारी ही तिसरी वंदे भारत एक्सप्रेस असल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी एक्सवर ट्विट करत या नव्या वंदे भारत ट्रेनची माहिती दिली. ते म्हणाले की. उधमपूरच्या नागरिकांच्या मागणी आणि आमच्या विनंतीनंतर रेल्वे मंत्रालयाने जम्मू-श्रीनगरदरम्यान धावणाऱ्या तिसऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला उधमपूर येथे थांबा देण्यास सहमती दर्शवली आहे.
जितेंद्र सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार मानत हा निर्णय या भागातील जनतेच्या अपेक्षांबाबत केंद्र सरकारची संवेदनशीलता दर्शवणारा असल्याचे म्हटले. तसेच सकारात्मक आणि तातडीने निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले.
दरम्यान दक्षिण पश्चिम रेल्वेच्या म्हैसूर विभागाने बेंगळुरू-मंगळुरू मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्याची चाचणी सुरू केली आहे. सकलेशपूर-सुब्रह्मण्य रोड या अत्यंत आव्हानात्मक घाट मार्गावर स्वयंचलित आपत्कालीन ब्रेक प्रणालीसह वंदे भारतची चाचणी घेतली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.