वंदे भारत की अमृत भारत? स्पीडपासून तिकीटदरापर्यंत, दोन्ही ट्रेनमध्ये काय फरक?

Vande Bharat vs Amrit Bharat: वंदे भारत आणि अमृत भारत एक्सप्रेसमध्ये वेग, तिकीटदर, कोच, सुविधा आणि प्रवासाच्या आरामात काय फरक आहे? जाणून घ्या दोन्ही ट्रेनची सविस्तर तुलना.
VANDE BHARAT VS AMRIT BHARAT: SPEED, FARE, COACHES & FACILITIES
VANDE BHARAT VS AMRIT BHARAT: SPEED, FARE, COACHES & FACILITIESsaam tv
Published On

देशात रेल्वेचं जाळं मोठ्या प्रमाणात विस्तारात आहे. तसेच ट्रेनची संख्या देखील वाढत आहे. यामध्ये वंदे भारत एक्सप्रेस आणि अमृत भारत एक्सप्रेस या गाड्यांनी प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले आहे. दोन्ही ट्रेनमध्ये आधुनिक सुविधा असल्या तरी त्यांची रचना, कोच आणि स्पीड आणि प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा यामध्ये बराच फरक आहे. वंदे भारत ही वेगवान आणि प्रीमियम प्रवासाचा अनुभव देण्यासाठी ओळखली जाते, तर अमृत भारत एक्स्प्रेसह ही लांब पल्ल्यासाठी आरामदायी प्रवासासाठी फायदेशीर आहे.

VANDE BHARAT VS AMRIT BHARAT: SPEED, FARE, COACHES & FACILITIES
Amrut Bharat Express : प्रवाशांसाठी खुशखबर! मुंबईतून धावणार आणखी एक अमृत भारत एक्स्प्रेस, कोणत्या स्थानकांवर थांबणार?

वंदे भारतचा वेग हा इतर रेल्वेपेक्षा सर्वाधिक आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, वंदे भारतचा स्पीड हा 160 किमी प्रतितास इतका आहे. मात्र प्रत्यक्ष वेग गाय संबंधित मार्गावरील ट्रक आणि परिस्थितीवर अवलंबून असतो. लवकर स्पीड पकडणे आणि तितकाच लवकर ब्रेक लावून ट्रेन थांबवणे ही वंदे भारतची प्रमुख वैशिष्टय आहेत. तर अमृत भारत एक्सप्रेसचा वेग हा सुमारे 130 किमी प्रतितास आहे. त्यामुळे कमी वेळेत प्रवास पूर्ण करायाचा असेल तर वंदे भारत हा चांगला पर्याय ठरू शकतो.

VANDE BHARAT VS AMRIT BHARAT: SPEED, FARE, COACHES & FACILITIES
महाराष्ट्र एक्सप्रेस बनली ‘झुरळांचं माहेरघर’; एक्सप्रेस महागडं तिकीट पण प्रवाशांना आरामाऐवजी झुरळांचा त्रास

तिकीट दर कोणत्या ट्रेनचे स्वस्त?

तिकीट दराचा विचार केला तर अमृत भारत एक्सप्रेस अधिक बजेट-फ्रेंडली पर्याय आहे. या ट्रेनची रचना प्रामुख्याने नॉन-एसी स्लीपर आणि अनारक्षित प्रवाशांना लक्षात घेऊन करण्यात आली आहे. याउलट, वंदे भारतची चेअर कार सेवा पूर्णपणे वातानुकूलित (AC) असून ती प्रीमियम श्रेणीत येते. त्यामुळे तिचे तिकीटदर तुलनेने जास्त असते. मात्र, प्रत्यक्ष भाडे हे प्रवासाचे अंतर, मार्ग आणि कोचच्या श्रेणीनुसार बदलते.

VANDE BHARAT VS AMRIT BHARAT: SPEED, FARE, COACHES & FACILITIES
पुणेकरांना मोठं गिफ्ट! नवीन एक्स्प्रेस धावणार,कोण कोणत्या स्थानकावर थांबणार? कधी सुरू होणार? वाचा अपडेट

कोचमध्ये काय फरक आहे?

वंदे भारतच्या चेअर-कार व्हर्जनमध्ये AC चेअर कार आणि एग्झिक्युटिव्ह क्लास अशा सीटिंग सुविधा उपलब्ध आहेत. अमृत भारतच्या सध्याच्या डिझाइनमध्ये नॉन-एसी स्लीपर आणि अनारक्षित कोच आहेत. अमृत भारतच्या कोचमध्ये आरामदायी सीट आणि बर्थ, सुधारित लगेज रॅक, मोबाईल चार्जिंग पॉइंट, CCTV, LED लाइटिंग आणि आधुनिक टॉयलेट यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.

VANDE BHARAT VS AMRIT BHARAT: SPEED, FARE, COACHES & FACILITIES
CSMT - Sawantwadi : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! मुंबईतून नवीन एक्क्सप्रेस धावणार; कोणकोणत्या स्थानकावर थांबणार? वाचा

कोणती ट्रेन अधिक चांगल्या सुविधा देते?

वंदे भारतमध्ये सील्ड गँगवे, GPS आधारित पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टम, आरामदायी सीटिंग, बायो-वॅक्यूम टॉयलेट यांसह अनेक आधुनिक सुविधा आहेत. अमृत भारतमध्येही मोबाईल चार्जिंग पॉइंट, CCTV, सुधारित बर्थ, आधुनिक लाइटिंग, सुरक्षा व्यवस्था आणि प्रेशराइज्ड फ्लशिंग सिस्टम यांसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत.

कोणासाठी कोणती ट्रेन योग्य?

तुमची प्राथमिकता जास्त वेग, AC प्रवास आणि प्रीमियम अनुभव असेल, तर वंदे भारत एक्सप्रेस हा चांगला पर्याय ठरू शकतो. मात्र, कमी बजेटमध्ये लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असेल आणि स्लीपर किंवा अनारक्षित प्रवासाला प्राधान्य असेल, तर अमृत भारत एक्सप्रेस अधिक उपयुक्त ठरू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com