Viral VIdeo: 'मोदीजी प्लीज, आमच्यासाठी चांगली शाळा बनवा,' जम्मूच्या चिमुरडीची पंतप्रधानांना विनंती; क्यूट video होतोय व्हायरल

Jammu Girl Viral Video : 'मोदीजी प्लीज, आमच्यासाठी चांगली शाळा बनवा,' जम्मूच्या चिमुरडीची पंतप्रधानांना विनंती
Jammu Girl Viral Video
Jammu Girl Viral VideoSaam Tv
Published On

Jammu Girl Viral Video : जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथील एका चिमुरडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील मुलगी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Jammu Girl Viral Video) तिच्या गावात शाळा बांधण्याची विनंती करत आहे.

लहानग्या सीरत नाझला तिच्या शाळेतील घाण फरशीवर तिच्या मैत्रिणींसह बसावे लागले. पंतप्रधान मोदींनी याबद्दल काहीतरी करावे अशी तिची इच्छा आहे.

तिचा हा व्हिडीओ (Viral Video) खूपच व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील लोहाई-मल्हार गावातील या चिमुरडीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Jammu Girl Viral Video) विनंती करत म्हटले आहे की, "प्लीज मोदीजी (Please Modi ji), आमच्यासाठी एक चांगली शाळा बनवा." (Latest Marathi News)

जम्मू-काश्मीरच्या 'मार्मिक न्यूज' नावाच्या फेसबुक पेजवर शेअर केलेल्या या व्हिडीओला (Viral Video) आतापर्यंत जवळपास 19 लाखांहून अधिक लोकांनी पहिला असून आणि याला 1,17,000 पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.

Jammu Girl Viral Video
Coronavirus Cases in India: देशात पुन्हा दिसणार कोरोनाचा कहर, दररोज 50 हजार केसेस येण्याची शक्यता; तज्ज्ञांचा इशारा

हा व्हिडीओ सुरु करताना ही मुलगी आपण सरकारी शाळेची विद्यार्थिनी असल्याचं सांगते. यानंतर ती या व्हिडीओच्या (Viral Video) माध्यमातून आपल्या शाळेतील सर्व परिसर दाखवते. आपल्या शाळेची वाईट परिस्थितीची माहिती ती या व्हिडीओच्या माध्यमातून देते.

कॅमेरात पाहून ती म्हणते की, ''मोदीजी, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे.'' यानंतर सीरत फोनचा कॅमेरा दोन बंद दारांसमोरील एका मोकळ्या काँक्रीट जागेवर घेऊन जाते. जे ती मुख्याध्यापक कार्यालय आणि कर्मचारी कक्ष असल्याचं सांगते.

Jammu Girl Viral Video
Japan PM Kishida : मोठी बातमी! जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर स्मोक बॉम्ब हल्ला

संपूर्ण शाळा दाखवल्यानंतर मुलीने पंतप्रधान मोदींना विनंती करत म्हटलं की, "मोदीजी, तुम्ही संपूर्ण देशाचे ऐकता, माझेही ऐका आणि प्लीज आमची शाळा चांगली बांधा. जेणेकरून माझा शाळेचा ड्रेस घाण होणार नाही आणि आई मला ओरडणार नाही. चांगली शाळा बांधल्यावर आम्ही सर्वजण खूप अभ्यास करू. प्लीज (Please Modi ji) आमच्यासाठी चांगली शाळा बनवा.'', असं म्हणत ती व्हिडीओ (Viral Video) संपवते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com