Japan PM Kishida : मोठी बातमी! जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर स्मोक बॉम्ब हल्ला

Japan News: जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर स्मोक बॉम्ब हल्ला
Japan PM Kishida
Japan PM Kishida Saam Tv

Japan PM Kishida : जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. जपानमधील वाकायामा शहरात भाषणादरम्यान एका व्यक्तीने त्यांच्यावर स्मोक बॉम्ब फेकल्याची माहिती आहे. मात्र बॉम्बचा स्फोट होईपर्यंत पंतप्रधान किशिदाला सुखरूप बाहेर काढण्यात आले.

'द जपान टाईम्स'च्या वृत्तानुसार, वाकायामा शहरात पंतप्रधान फुमियो किशिदा आपले भाषण सुरू करणार होते, त्याआधीच हा स्फोट झाला. स्मोक बॉम्ब फेकल्यानंतर आजूबाजूला धुराचे लोट पसरले होते. या घटनेचा व्हिडीओ देखिलस अमोर आला आहे. या व्हिडीओत घटनास्थळी जमलेले लोक सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी धावताना दिसत आहेत. दरम्यान, सुरक्षा दलांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.  (Latest Marathi News)

Japan PM Kishida
Pulwama Attack : मोदी सरकारवर देशद्रोहाचा खटला चालवा; पुलवामा हल्ल्याबाबत सत्यपाल मलिकांच्या गभीर आरोपानंतर संजय राऊतांचा हल्लाबोल

सभेत झालेल्या स्फोटानंतर पंतप्रधान किशिदा थोडक्यात बचावले. सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ ते भाषण करणार होते, असे सांगण्यात येत आहे.

किशिदा 2021 मध्ये झाले पंतप्रधान

फुमियो किशिदा 2021 मध्ये जपानचे पंतप्रधान झाले. यासोबतच ते लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीचे (एलडीपी) अध्यक्ष आहेत. त्यांनी 2012 ते 2017 पर्यंत परराष्ट्र मंत्री म्हणून काम केले आणि 2017 मध्ये त्यांनी कार्यवाहक संरक्षण मंत्री म्हणून काम केले. 2017 ते 2020 पर्यंत त्यांनी एलडीपी पॉलिसी रिसर्च कौन्सिलचे अध्यक्षपद भूषवले. नुकतेच किशिदा भारतात आले होते, भारतात त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं होतं.

Japan PM Kishida
IPL 2023 Betting Crime : आयपीएलवर सट्टा लावणं पडलं महागात; मुंबईतून 8 जणांना अटक, 2 बुकींचा शोध सुरू

शिंजो आबे यांच्यावरही भाषणादरम्यान झाला होता प्राणघातक हल्ला

यापूर्वी माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची गेल्या वर्षी 8 जुलै रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. भाषणादरम्यान शिंजो आबे यांच्यावरही हल्ला करण्यात आला. नारा शहरात ते भाषण देत असताना त्याचवेळी त्यांच्यावर गोळीबार झाला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारसाठी दाखल केले असता तेथे त्यांचा मृत्यू झाला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com