Pulwama Attack : मोदी सरकारवर देशद्रोहाचा खटला चालवा; पुलवामा हल्ल्याबाबत सत्यपाल मलिकांच्या गभीर आरोपानंतर संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut Latest Press Conference : मोदी सरकारवर देशद्रोहाचा खटला चालवा, सत्यपाल मलिकांच्या गभीर आरोपानंतर संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut News
Sanjay Raut NewsSAAM TV
Published On

Sanjay Raut Latest Press Conference : मोदी सरकारच्या निष्काळजीपणामुळेच पुलवामा हल्ला झाल्याचा गंभीर आरोप जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला आहे. यावरच आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही वक्तव्य केलं आहे.

ते म्हणाले आहेत की, आताच्या सत्ताधाऱ्यांची जवानांची पुलवामात हत्या करावी आणि नंतर त्याच राजकारण करावं अशी काही योजना होती का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच सत्यपाल मलिक यांनी स्फोटक सत्य आणलं आहे, असं ते म्हणाले आहेत.

Sanjay Raut News
Japan PM Kishida : मोठी बातमी! जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर स्मोक बॉम्ब हल्ला

पुलवामा हल्ल्यावरून काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत म्हणाले की, ''पुलवामा हल्ल्यात काहीतरी गडबड आणि घोटाळा आहे, ही गोष्ट आधीच देशाला माहित होती. यामध्ये तेव्हाचे सत्ताधारी 2019 च्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जात होते. ते निवडणूक जिंकण्यासाठी काहीतरी गडबड करतील.''  (Latest Marathi News)

राऊत म्हणाले, ''हे प्रश्न आम्ही वारंवार विचारण्याचा प्रयत्न केला आहे की, पुलवामात 150 किलो आरडीएक्स पोहोचाल कसं? पुलवामाच्या रस्त्याने कधीही सुरक्षाकर्मी कधीही प्रवास करत नाही. त्यांना एअर फोर्स किंवा सरकारने विमान का दिलं नाही? त्यांची पुलवामात हत्या करावी आणि नंतर त्याच राजकारण करावं अशी काही योजना होती का? हे प्रश्न तेव्हा सुद्धा विरोधी पक्षाने विचारले. पण असे प्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही म्हटलं गेलं, तसेच ते पाकिस्तानची भाषा बोलतायत असं म्हणत गुप्प करण्यात आलं.''

Sanjay Raut News
IPL 2023 Betting Crime : आयपीएलवर सट्टा लावणं पडलं महागात; मुंबईतून 8 जणांना अटक, 2 बुकींचा शोध सुरू

सरकारवर देशद्रोहाचा खटला चाललाच पाहिजे: राऊत

संजय राऊत पुढे म्हणाले, ''आज त्यांनीच नेमलेले तेव्हाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी तेच स्फोटक सत्य समोर आणलं आहे. या सरकारवर देशद्रोहाचा खटला चाललाच पाहिजे. तसेच जे मंत्री जबाबदार आहे, त्यांचं कोर्टमार्शल व्हायला पाहिजे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com