Coronavirus Cases in India: देशात पुन्हा दिसणार कोरोनाचा कहर, दररोज 50 हजार केसेस येण्याची शक्यता; तज्ज्ञांचा इशारा

Coronavirus Update: दररोज कोरोनाचे 50 हजार केसेस येण्याची शक्यता, तज्ज्ञांचा इशारा
Coronavirus Cases in India
Coronavirus Cases in IndiaSaam Tv
Published On

Coronavirus Cases in India: देशात पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. अशातच दररोज कोरोनाची 10,000 हून अधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत. यातच आयआयटी कानपूरचे प्राध्यापक डॉ.मनिंद्र अग्रवाल यांनी एक भयावह भविष्यवाणी केली आहे.

ते म्हणतात की, मे महिन्याच्या मध्यात कोविडची प्रकरणे शिगेला पोहोचण्याची शक्यता आहे. गणितीय मॉडेलच्या आधारे केलेल्या अंदाजानुसार, मे महिन्यात सुमारे 50 ते 60 हजार कोविड प्रकरणांची नोंद होण्याची शक्यता आहे.

Coronavirus Cases in India
Pulwama Attack : मोदी सरकारवर देशद्रोहाचा खटला चालवा; पुलवामा हल्ल्याबाबत सत्यपाल मलिकांच्या गभीर आरोपानंतर संजय राऊतांचा हल्लाबोल

कोविड प्रकरणे का वाढतील?

आयआयटी कानपूरच्या प्राध्यापकांनी कोविड प्रकरणांमध्ये वाढ होण्याची दोन कारणे सांगितली आहेत. पहिले कारण म्हणजे व्हायरसशी लढण्याची नैसर्गिक प्रतिकारशक्ती आता 5 टक्के लोकांमध्ये कमी झाली आहे. दुसरे कारण म्हणजे कोरोनाचा नवीन प्रकार जो वेगाने पसरत आहे. (Latest Marathi News)

प्रोफेसर अग्रवाल म्हणाले की, भारतातील 90 टक्के लोकांमध्ये आणि उत्तर प्रदेशातील सुमारे 95 टक्के लोकांमध्ये नैसर्गिक प्रतिकारशक्ती आहे. अग्रवाल म्हणाले की, येत्या काही महिन्यांत 50 हजार कोरोना रुग्णांची नोंद होणार आहे. मात्र एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या देशासाठी ही फार मोठी गोष्ट नाही, असे ते म्हणाले.

Coronavirus Cases in India
Japan PM Kishida : मोठी बातमी! जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर स्मोक बॉम्ब हल्ला

ते म्हणतात की, बहुतेक प्रकरणांमध्ये लक्षणे सौम्य असतात. खोकला आणि सर्दीची तक्रार असलेल्या लोकांवर घरी उपचार केले जात आहेत. अशा परिस्थितीत कोरोनाचा सामान्य फ्लूप्रमाणेच उपचार केला पाहिजे आणि तो दुसऱ्या लाटेसारखा धोकादायक ठरणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com