

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांच्या हत्येचा कट उघडकीस आला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) कडून प्रशिक्षित एका दहशतवाद्याने इवांका ट्रम्प यांना ठार मारण्याचा संपूर्ण कट रचला होता. 'द पोस्ट' वृत्तपत्राला मिळालेल्या माहितीनुसार, या दहशतवाद्याला त्यांच्या गुरुचा बदला घ्यायचा होता.
सहा वर्षांपूर्वी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात त्याचे गुरू आणि इराणी लष्करी कमांडर कासिम सुलेमानी यांचा मृत्यू झाला होता. सुरक्षा यंत्रणांनी इवांका ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या एका दहशतवाद्याला अटक केली आहे. त्याचे नाव ३२ वर्षीय मोहम्मद बाकेर साद दाऊद अल-सादी असून तो इराकी नागरिक आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार, इराणचे सर्वोच्च लष्करी कमांडर कासिम सुलेमानी यांना अमेरिकेच्या लष्काराने ठार केले होते. ही कारवाई सहा वर्षांपूर्वी बगदादमध्ये करण्यात आली होती. इवांका ट्रम्प यांच्या हत्येचा कट आखणारा दहशतवादी कमांडर कासिम सुलेमानी यांना गुरु मानत होता, त्यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तो ट्रम्प कुटुंबाचा उद्धवस्त करण्याचा प्रयत्न करत होता.
आरोपी अल-सादीने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबाला, विशेषतः त्यांची मुलगी इवांका ट्रम्प यांना ठार मारण्याची शपथ घेतली होती. तपासादरम्यान सुरक्षा दलांनी अल-सादीकडून इवांका ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील आलिशान घराचे संपूर्ण ब्लूप्रिंट जप्त केले आहे. त्याने इवांका ट्रम्प यांच्या घराची रेकी केली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.