डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न करणारा कोण? हल्लेखोर इंजिनीअरचे NASA कनेक्शन उघड

donald trump latest news update : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. हल्लेखोर हा इंजिनीअर असल्याचेही उघड झालं आहे.
donald trump news
donald trumpSaam tv
Published On
Summary

ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्याची माहिती समोर

हल्लेखोर एलेन कॅलिफोर्नियातील निवासी

निवडणुकीच्या काळात कमला हॅरिस यांना दिले होते दान

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराविषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ३१ वर्षीय कोल थॉमस एलेन कॅलिफोर्नियाच्या टोरेंन्सचा निवासी आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, थॉमसजवळ शॉटगन, हँडगन आणि अनेक प्रकारचे धारदार शस्त्र होते. एलेन हा उच्चशिक्षीत आहे. तो नासाचा फेलो देखील होता. उच्चशिक्षित असलेल्या थॉमसच्या कृत्याने संपूर्ण अमेरिकेत खळबळ माजली आहे.

donald trump news
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला? हॉटेलमध्ये अंदाधुंद गोळीबार, सीक्रेट सर्व्हिसने कसा वाचवला जीव? VIDEO

अनेक सोशल मीडिया हँडल्स आणि लिंक्डइनवर एलेन हा मॅकेनिकल इंजिनीअर कॉम्प्यूटर सायन्टिस्ट आणि गेम डेव्हलेपर असल्याचे सांगण्यात आलं आहे. लॉस एंजिलिन्समध्ये अर्ध वेळ शिक्षकाचेही काम केलं आहे. एलेन कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीतून ग्रॅज्युएट झाला आहे. त्याने २०१७ साली मॅकेनिकल इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर ऑफ सायन्सची डिग्री घेतल्या होत्या. त्याने कॅलिफोर्नियातून कॉम्प्यूटर सायन्समधून मास्टर्स डिग्री मिळवल्या आहेत. तो कॅलटेकचा माजी विद्यार्थी देखील होता. त्याने २०१६ साली रोबोटिक वाहन डिझाइन स्पर्धा देखील जिंकली होती.

नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोटरीमध्ये सम अंडरग्रॅज्युएट रिसर्च फेलोसिपमध्ये सहभाग नोंदवला होता. त्याने रिपोर्टनुसार, तो नासाचा फेलो होता. एलेनने आयजेके कंट्रोल्समध्ये मॅकेनिकल इंजिनिअर म्हणून काम केलं आहे. कॅलटेकमध्ये ट्युटरिंग असिस्टंट म्हणूनही सेवा दिली आहे. लॉस एंजेल्स भागात सी२ एज्युकेशनमध्ये अधवेळ शिक्षक म्हणूनही काम केलं आहे. त्यावेळी 'टीचर ऑफ मंथ' म्हणून सन्मानित करण्यात आलं होतं.

donald trump news
डोंबिवली ते CSMT प्रवास जलद होणार, गर्दीचा प्रश्न मिटणार; मध्य रेल्वेने घेतले महत्त्वाचे कामे हाती

मॉलिक्यूलर केमेस्ट्रीवर आधारित स्टीम प्लॅटफॉर्मसाठी एक व्हिडिओ गेम देखील डेव्हलप केला आहे. त्याने बाह्य अवकाशात घडणार्‍या 'टॉप डाऊन शूटर'वर काम करत असल्याचे एलनने केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. एलनने 'बोहेमिया' आणि 'फर्स्ट लॉ'सारखे गेम्स तयार केले आहेत. एलनने कमला हॅरिस यांच्या २०२४ यांच्या अध्यक्षीय उमेदवारीला पाठिंबा देण्यासाठी २५ डॉलर दान केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com