5 कोटी नोकऱ्या जाणार? नोकऱ्यांवर AI आणि युद्धाचं सावट, वाचा खास रिपोर्ट

iran israel war effect : इराण-इस्रायल युद्ध पेटलेलं असताना दुसरीकडे फॉक्सवॅगन कंपनीनं नोकर कपात करण्याचा मोठा निर्णय जाहीर केलाय...त्यामुळे भविष्यात AI आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरातील 5 कोटी नोकऱ्या कशा धोक्यात आलेत.... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
iran israel war effect
iran israel war effect on jobs Saam tv
Published On

इस्रायल-इराण युद्धामुळे जागतिक बाजारपेठ ढवळून निघालीय. अनेक देशांची इंधन तुटव़ड्यामुळे चांगलीच होरपळ झालीय. एकीकडे युद्धाचे हे परिणाम तात्पुरते असले तरी याचं दुरगामी परिणाम थेट नोकऱ्यांवर होणार आहे..ऑटोमोबाईल क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या फॉक्सवॅगनने तर टप्याटप्यानं 50 हजार नोकऱ्या कमी करण्याची घोषणा केलीय..

2030 पर्यंत जर्मनीतील फॉक्सवॅगन कंपनीतल्या 50 हजार लोकांना नोकरीवरून काढून टाकणार... ऑडी आणि पोर्शोमधील कर्मचाऱ्यांना फटका बसणार ...कंपनीचा नफा कमी झाल्याने, बाजारातील स्पर्धा वाढल्यानं आणि अमेरिकेच्या अतिरिक्त टॅरिफमुळे हा निर्णय घेण्यात आलाय..

iran israel war effect
'उपमुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधून आलोय'; गोदामात शिरून ४ सिलिंडर घेऊन गेले; एजन्सी कर्मचाऱ्यांच्या तपासानंतर धक्कादायक माहिती उघड

दरम्यान युद्ध आणि AI अशा दुहेरी संकटामुळे नोकऱ्यांवर कशी कुऱ्हाड कोसळणार आहे... पाहूयात..

जानेवारी 2026 ते फेब्रुवारी 2026 पर्यंत 33 हजार टेक कर्मचाऱ्यांना आधीच कामावरून काढण्यात आलयं... आयएमएफच्या प्रमुख क्रिस्टलिना जॉर्जियावा यांनीही येत्या काही वर्षांत जगभरातील 40 टक्के नोकऱ्यांवर एआयचा परिणाम होणार असल्याचं सांगितलयं...विकसित देशांमध्ये 60 टक्के लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आहे... वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या 'फ्यूचर ऑफ जॉब्स २०२५' या अहवालानुसार, 2030 पर्यंत जगभरातील 92 दशलक्ष नोकऱ्या जाणार...

iran israel war effect
पोटाची खळगी भरण्यासाठी रिक्षा चालवणारी 'हिरकणी' आई; ३ वर्षांच्या मुलीसोबत कष्टमय झुंज

एकीकडे युद्धाने अर्थव्यवस्था पोखरली आहे आणि दुसरीकडे एआयने कार्यपद्धती बदलली आहे. अशावेळी कंपन्यांचा नफा घटतोय..ज्यामुळे तोटा भरून काढण्यासाठी कंपन्या कर्मचाऱ्याची कपात करतायत...त्यामुळे एआयचा सामना करताना स्वतःला अपडेट करणे हेच आता कर्मचाऱ्यांसमोरचे सर्वात मोठं आव्हान असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com