

कल्याणमध्ये कोमल गायकवाड नावाच्या महिला रिक्षा चालकाची जोरदार चर्चा
तीन वर्षांच्या मुलीसोबत चालवतात दिवसभर रिक्षा
घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे चालवतात रिक्षा
संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
आयुष्यातील कठीण परिस्थितीशी दोन हात करत मुलीचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी धडपडणाऱ्या महिला रिक्षा चालकाची सर्वत्र चर्चा होत आहे. महिला रिक्षा चालक दिवसभर तीन वर्षांच्या मुलीला घेऊन रिक्षा चालवते. घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. कल्याण भाड्याच्या घरात राहून त्या मुलीचा सांभाळ करतात.
कोमल गायकवाड असे महिला रिक्षा चालकाचे नाव आहे. तर तेजस्वी असे तीन वर्षीय लेकीचं नाव आहे. महिला रिक्षा चालक कोमल यांचे सासू-सासरे आजारी आहेत. त्यामुळे त्यांचे पती गावी राहतात. त्यामुळे कल्याणमध्ये मुलीची काळजी घेण्यासाठी कुणीही नाही. त्यामुळे कोमल या मुलगी तेजस्वीला सोबत घेऊनच रिक्षा चालवण्याचे काम करतात. त्या सकाळ ते रात्री बारापर्यंत रिक्षा चालवून कुटुंबाचा उदारनिर्वाह करतात.
कोमल यांनी शिक्षण कमी असल्याने रिक्षा चालवण्याचा मार्ग स्वीकारला. तसेच लहान मुलीला सोबत घेऊन कोणीही काम देण्यास तयार नसल्याने रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मुलीच्या काळजीपोटी रिक्षामध्ये मुलीसाठी खास बसण्याचा स्टँड तयार करून घेतला आहे. मुलगी तेजस्वी स्टँडमध्ये आरामात बसते. यामुळे प्रवाशांनाही प्रवसादरम्यान कोणताही त्रास होत नाही.
दिवसभर कष्ट करणाऱ्या माय-लेकीची जोडी कल्याणमध्ये चांगलीच चर्चेत आली आहे. माझ्यासारखी परिस्थिती माझ्या मुलीवर येऊ नये, तिला चांगलं शिक्षण देऊन पोलीस अधिकारी बनवायचं आहे, असे कोमल यांनी सांगितले. आई आपल्या मुलासाठी किती मोठा त्याग करू शकते याचे जिवंत उदाहरण म्हणजे कोमल गायकवाड ठरल्या आहेत. इतिहासातील हिरकणीने लेकरासाठी जीवाची पर्वा न करता गड सर केला. तशीच मुलीच्या भविष्यासाठी संघर्ष करणारी ही हिरकणी आईची कल्याणमध्ये जोरदार चर्चा होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.