Slow Vande Bharat Express: देशातील पहिली सर्वात स्लो वंदे भारत; १६० ऐवजी ५०च्या स्पीडने धावणार; कारण काय?

India's First Slow Vande Bharat Express to Run on Bengaluru to Goa: देशात आता सर्वात स्लो वंदे भारत ट्रेन धावणार आहे. बंगळुरु ते गोवा या मार्गावर ही वंदे भारत धावण्याचा प्रस्ताव आहे.
Slow Vande Bharat Express
Slow Vande Bharat ExpressSaam Tv
Published On
Summary

रेल्वे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

देशातील पहिली सर्वात स्लो वंदे भारत धावणार

१६०ऐवजी ५०च्या स्पीडने धावणार

रेल्वे एक महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. रेल्वे आता देशातील सर्वात कमी स्पीडने धावणारी वंदे भारत ट्रेन सुरु करणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही सर्वात वेगवान धावणारी ट्रेन आहे. परंतु आता यामध्येच सर्वात कमी स्पीडने धावणारी ट्रेन सुरु केली जाणार आहे. या ट्रेनची स्पीड ५० किलोमीटर प्रति तास असणार आहे.

Slow Vande Bharat Express
Vande Bharat: वंदे भारतबाबत रेल्वेचा मोठा निर्णय, २४ डब्याची ट्रेन लवकरच धावणार; आता प्रवास होणार आणखी सुसाट

सर्वात कमी स्पीडने धावणारी वंदे भारत (India's First Slow Vande Bharat Express)

वंदे भारत ट्रेन तासाला १६० किमीच्या स्पीडने धावते. त्यामुळेच प्रवासाचा वेळ खूप कमी होतो. आता एक वंदे भारत ट्रेन सर्वात कमी स्पीडने धावणार आहे.ही ट्रेन स्पीड ५०किलोमीटर प्रति तास वेगाने धावणार आहे.

रेल्वे बंगळुरु ते यशवंतपुर स्टेशन आणि गोवा ते मडगाव रेल्वे स्टेशनपर्यंत सेमी हाय स्पीड ट्रेन सर्व्हिस सुरु करण्याच्या तयारीत आहे. याच महिन्याच्या सुरुवातीला साउथ वेस्टर्न रेल्वे, साउथ रेल्वे, कोकण कॉर्पोरेश लिमिटेडने हा प्रस्ताव रेल्वेला दिला आहे.

रेल्वेने या प्रस्तावाला मंजुरी दिली तर बंगळुरु-गोवा वंदे भारत सर्व्हिस आठवड्यात ६ दिवस सुरु राहण्याची शक्यता आहे. हा मार्ग मंगळुर स्टेशनला बायपास होऊन जाईल. यामुळे कर्नाटक आणि गोव्यामध्ये कनेक्टिव्हिटी वाढेल. दरम्यान,अजूनपर्यंत या ट्रेनचा स्पीड वाढवण्याबाबत कोणतीही शक्यता दिसत नाहीये.

१२ तासात बंगळुरु ते गोवा

प्रस्तावानुसार, नवीन वंदे भारत एक्सप्रेस जी बंगळुरु ते गोवा या मार्गावर धावणार आहे तिचा स्पीड कमी असणार आहे. ७०० किलोमीटर अंतर कापण्यासाठी १२ तास लागणार आहे. सध्या या मार्गावर वास्को द कामा यशवंतपुर एक्सप्रेस गोवा ते बंगळुरु येथे १५ तासात जाते. दरम्यान, जर नवीन वंदे भारत एक्सप्रेसचा प्रस्ताव मंजुर झाला तर हे अंतर १२ तासात गाठता येणार आहे.

Slow Vande Bharat Express
Vande Bharat: वंदे भारतबाबत रेल्वेचा मोठा निर्णय, २४ डब्याची ट्रेन लवकरच धावणार; आता प्रवास होणार आणखी सुसाट

कोणत्या ठिकाणी थांबणार?

प्रस्तावानुसार, बंगळुरु-गोवा वंदे भारत ट्रेन काही स्टेशनवर थांबणार आहे. हासन, सकलेशपुर, सुब्रमण्यम रोड अशा ठिकाणी ट्रेनसाठी थांबे असणार आहे. ही ट्रेन कोकणातील घाटमाथ्याच्या रस्त्यातून जाणार आहे. या मार्गात ट्रेन हळू चालवावी लागणार आहे. त्यामुळेच वंदे भारत ट्रेनची स्पीड कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त याच मार्गावर कमी स्पीडची ट्रेन धावणार आहे.

Slow Vande Bharat Express
Mumbai Solapur Vande Bharat: मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस किती वाजता सुटते? ठाणे, पुण्यासह या स्टेशनवर थांबा; वाचा संपूर्ण वेळापत्रक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com