पाकचं भारतात एन्फ्लुएन्सर नेटवर्क? युट्यूबर्सची ईडी, एनआयए करणार चौकशी? गद्दार इन्फ्लूएन्सर सरकारच्या रडारवर

युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर आता गद्दार इन्फ्लूएन्सर सरकारच्या रडारवर आहेत. त्यामुळे युट्यूबर्सची संपत्ती, घरं याची झाडाझडती तपास यंत्रणांकडून होईल. त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट...
Pakistani spy
Pakistani spySaam Tv Youtube
Published On

सुप्रीम म्हसकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर अनेकांना धक्का बसलाय. हीच ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचं समोर येताच आता देशातील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत.

गद्दार ज्योती मल्होत्रासोबत दिसणारी ही तरुणी आहे, प्रियंका सेनापती. प्रियंकाही युट्यूबर असून तिचे ट्रॅव्हल ब्लॉग सोशल मीडियावर आता चर्चेत आहेत. मात्र ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर पाकिस्तानवारी करणारी प्रियंका सेनापती ही संशयाच्या भोवऱ्यात अडकलीय. प्रियंकानं मार्च 2024 मध्ये पाकच्या करतारपूरचा एक युट्यूब व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यामुळे ती ही यंत्रणांच्या रडारवर आली आहे. ज्योती मल्होत्रामुळे अडचणीत आलेली प्रियंका ही एकटीच नाही. तर आता नवांकुर चौधरी हा युट्यूबरही चर्चेत आहे. युट्यूबर नवांकुर चौधरीवरही पाकसाठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे. मात्र त्यानं सगळे आरोप फेटाळून लावलेत.

Pakistani spy
Mumbai Crime : दोन हजार देण्यास नकार, ४० वर्षीय मित्राकडून ७६ वर्षीय वृद्धावर अनैसर्गिक अत्याचार

मल्होत्राच्या अटकेमुळे भारतविरोधी कारवाया करण्यासाठी पाकिस्तान भारतातील घरभेंदींची निव़ड करतेय, हे निश्चित. त्यातही सोशल मिडीयावर लाखोंचे फॉलोअर्स असणाऱ्यांची जाणीवपूर्वक निवड केली जातेय. त्यामुळेच भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी अशा युट्युबर्सची चौकशी करण्याची मागणी केलीय.

Pakistani spy
Crime : मादक पेय पाजलं, बेशुद्धीच्या अवस्थेत गैरफायदा उचलला; भाजप पदाधिकाऱ्याचा मित्रासह तरुणीवर सामूहिक अत्याचार

युट्यूबर्सची चौकशी करा!

सर्वच युट्यूबर्स, फेसबुक पत्रकारांची चौकशी करा

गेल्या 3 वर्षात भारतीयांनी फक्त YouTube च्या माध्यमातून 21 हजार कोटी रुपये कमावले

युट्यूबर्सची 5 वर्षातील परदेश दौरे, जाहिराती, बँक खाती, गाड्या, घरे यांची माहिती घ्या

परदेशी शक्तींसोबत देशविरोधी अजेंडा चालवत नाहीत ना याची चौकशी करा.

Pakistani spy
मुलीच्या वयाच्या अभिनेत्रींशी रोमान्स, एकीशी लिपलॉक, तर दुसरीशी इंटिमेट सीन; ७० वर्षीय अभिनेता होतोय ट्रोल

युद्धात शत्रू राष्ट्र कशाप्रकारे घरभेदींचा उपयोग करून घेतो. याबद्दल एसपी शशांक कुमार यांनी काय म्हटलय पाहूया..

ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर पाकिस्तानशी संबध असल्यामुळे 11 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. ही संख्या ज्य़ोतीच्या तपासानंतर वाढण्याची शक्यता आहे. ताब्यात घेतलेल्या युट्यूबर्सची चौकशीही केली जात आहे... पाकच भारतातलं हे एन्फ्लुएन्सर नेटवर्क मुळासकट उखडून टाकण्याचं नवीन आव्हान आता तपास यंत्रणांसमोर आहे.

Pakistani spy
“बाई आणि बाटली या दोन गोष्टींपासून दूर राहायचं”, प्रसिद्ध अभिनेत्याने लेकाला दिला सल्ला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com