Indian-Origin CEO: आशियाई महिलांसोबत सेक्स, प्रति तास ५० हजार; लक्झरी वेश्यालय घोटाळ्यात भारतीय CEOचा समावेश

Gradiant CEO Anurag Bajpayee: भारतीय मूळचे उद्योजक आणि ‘Gradient’ या क्लीन वॉटर स्टार्टअपचे सहसंस्थापक व सीईओ अनुराग बाजपेयी यांचे नाव हाय प्रोफाइल वेश्यालय घोटाळ्यात आल्याने कॉर्पोरेट क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
Crime
CrimeSaam
Published On

भारतीय मूळचे उद्योजक आणि ग्रेडिएंट या क्लीन वॉटर स्टार्टअपचे सहसंस्थापक आणि सीईओ अनुराग बाजपेयी एका हाय प्रोफोईल वेश्यालय घोटाळ्यात अडकल्याने कॉर्पोरेट जगतात खळबळ उडाली आहे. हार्वर्ड विद्यालयाजवळील आलिशान अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या या अवैध वेश्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. प्रति तास ($600) (सुमारे ५० हजार रूपये) मोजून शारीरिक संबंध ठेवणाऱ्या उच्चभ्रू ग्राहकांमध्ये बाजपेयी यांच्याही नावाचा समावेश आहे. हाय प्रोफाइल वेश्यालय घोटाळा उघडकीस आल्यानंतर कॉर्पोरेट जगतात खळबळ उडाली आहे.

न्यू यॉर्क पोस्ट आणि वॉल स्ट्रीट जर्नलचे वृत्त आणि बोस्टन न्यायालयीन कागदपत्रांनुसार, या घोटाळ्यात ३० हून अधिक हाय प्रोफाइल व्यक्तींच्या नावाचा समावेश आहे. या व्यक्तींमध्ये बाजपेयी यांच्याही नावाचा समावेश आहे. अनुराग बाजपेयी यांनी अनेकवेळा वेश्यालयात हजेरी लावल्याचा आणि पैसे दिल्याचे ठोस पुरावे तपास यंत्रणांकडे असल्याची माहिती आहे.

Crime
Congress: "मोफत गायन तरीही पैशांची मागणी", काँग्रेसच्या बड्या नेत्याने मंगेशकर कुटुंबावरील आरोपांचा पाढाच वाचला

घोटाळा कसा उघडकीस झाला?

हे प्रकरण नोव्हेंबर २०२३ मध्ये उघडकीस आला होता. अमेरिकन अधिकाऱ्यांनी बोस्टन आणि आसपासच्या भागात एका गुप्त वेश्यालयाच्या नेटवर्कचा पर्दाफाश केला होता. हे नेटवर्क केंब्रिज, वॉटरटाउन, डेधम आण इस्ट व्हर्जिनियामधील हाय प्रोफाइल सोसायटीमध्ये चालवला जात होता. या सोसायटीमध्ये अनेक हाय प्रोफाइल व्यक्ती येत असल्याची माहिती वकील जोशुआ लेव्ही यांनी दिली होती.

Crime
रिक्षा चालकाने गळफास घेत आयुष्य संपवलं, खिशात सुसाईड नोटही सापडली | Kalyan News

अनुराग बाजपेयीने अनेकवेळा वेश्यालयात जाऊन प्रति तास ($600) (५१, ६२५ रूपये) वेश्यांना मोजल्याचा आरोप आहे. वेश्यालयातील ग्राहकांमध्ये वाजपेयीसह डॉक्टर, वकील, कॉर्पोरेट अधिकारी, सरकारी कंत्राटदार आणि सार्वजनिक अधिकारी यांचाही समावेश आहे. वेश्या व्यवसायात बहुतांश महिला या आशियाई खंडातील असल्याची माहिती आहे. त्या अनेकवेळा सेक्स ट्रॅफिकिंगमध्येही अडकल्याची माहिती आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या रॅकेटमध्ये सहभागी असलेले पुरूष प्रामुख्याने आशियाई खंडातील महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी प्रति तास $६०० पर्यंत मोजतात. या धक्कादायक घोटाळ्याची माहिती उघडकीस आल्यानंतर कॉर्पोरेट जगतात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com