रिक्षा चालकाने गळफास घेत आयुष्य संपवलं, खिशात सुसाईड नोटही सापडली | Kalyan News

Kalyan Auto Driver Ends Life Leaves Behind Suicide Note Blaming Moneylender: कल्याणमध्ये रिक्षाचालकाची आत्महत्या. सावकाराच्या जाचाला कंटाळून घेतला टोकाचा निर्णय. कल्याणमध्ये खळबळ.
Auto Driver
Auto DriverSaam
Published On

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

कल्याण जवळील मोहने परिसरातून एक अत्यंत दुर्देवी आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर येत आहे. सावकाराच्या जाचाला कंचाळून एका रिक्षा चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याने आपल्या खिशात सुसाईड नोट ठेवून हा टोकाचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात सावकार सचिन दळवी आणि एका अज्ञात महिलेविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

विजय मोरे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते कल्याण पश्चिम मोहने परिसरात आपल्या पत्नी आणि दोन मुलांसोबत राहत होते. विजय मोरे हे रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. ३१ मार्च रोजी त्यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. सावकाराच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या करायचं ठरवलं.

Auto Driver
Washim: पैशांसाठी पोटच्या गोळ्याला संपवलं! बापाने चाकूने सपासप वार करत मुलाचा जीव घेतला; घरातच रक्ताचा पाट

सायंकाळच्या सुमारास विजय मोरे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याची माहिती कुटुंबाला मिळाल्यानंतर त्यांनी विजय यांना घेऊन रूग्णालयात धाव घेतली. उपचाराकरिता रूग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या खिशामध्ये डॉक्टरांना एक चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीत मोरे यांनी कर्जदाराकडून माझा खूप छळ होतोय, कर्जदाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे त्यांनी नमूद केले होते.

Auto Driver
प्रेमाचा शेवट सैराट! विवाहितेसोबत अनैतिक संबंध, कुटुंबाला आला राग; दोघांना जंगलात नेलं अन् रात्रीच..

याबाबत विजय मोरे यांचे बंधू राजू मोरे यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात संबंधित सावकाराविरोधात तक्रार नोंदवली. विजय मोरे यांनी सचिन दळवी या सावकाराकडून कर्ज घेतले होते. सचिन दळवी आणि एक महिला या कर्जाच्या वसुलीसाठी मोरे यांच्या घरी जाऊन त्यांना शिवीगाळ करत मानसिक त्रास देत होते. त्यामुळे मानसिक तणावातून विजय मोरे यांनी आत्महत्या केली.

खडकपाडा पोलिसांनी याप्रकरणी सावकार सचिन दळवी आणि एका अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला. रिक्षाचालकाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या या सावकाराविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com