मी पण सैन्यात जाईन, माझ्या वडिलांचा बदला... पाकड्यांच्या गोळीबारात शहीद झालेल्या जवानाची लेक भावुक, पाहा Video

India Pakistan Tension : पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात एअरफोर्सचे जवान सुरेंद्र मोगा यांना वीरमरण आले. राजस्थानमधील त्यांच्या मूळगावी मोगा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
surendra monga
surendra mongax
Published On

भारत पाकिस्तान तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. काल अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर दोन्ही देशांनी युद्धविरामाच्या निर्णयावर सहमती दर्शवली होती. पण अवघ्या काही तासांमध्येच पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानने सीमावर्ती भागात गोळीबार केला. जम्मू-काश्मीरच्या आर.एस.पुरा सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये एअरफोर्सचे जवान सुरेंद्र मोगा यांना वीरमरण आले. राजस्थानमधील मंडावा या मूळ गावी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुरेंद्र मोगा यांचे पार्थिव रविवारी लष्करी सन्मानासह त्यांच्या गामी आणण्यात आले. भारत माता की जय आणि शहीद सुरेंद्र अमर रहे या घोषणांनी गावातील रस्ते दुमदुमले. शहीद सुरेंद्र मोगा यांची ११ वर्षांची मुलगी वर्तिकाने 'मला माझ्या वडिलांसारखे सैनिक व्हायचे आहे आणि मी माझ्या वडिलांचा बदला घेईन' असे म्हटले. वर्तिकाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

surendra monga
भयंकर! जाड्या-जाड्या म्हणून हिणवलं, २० KM पाठलाग अन् २ तरुणांवर धाडधाड गोळ्या झाडल्या

'शत्रूला मारताना आणि देशाचे रक्षण करताना माझे वडील शहीद झाले याचा मला अभिमान आहे. काल रात्री नऊच्या सुमारास आमचं बोलणं झालं. जम्मूमध्ये ड्रोन फिरत आहेत, पण हल्ला होत नाहीये, मी सुखरुप आहे असे त्यांनी सांगितले होते. ते आमचं शेवटं बोलणं ठरलं. पाकिस्तानला पूर्णपणे संपवायला हवं, पाकिस्तानचं नाव देखील राहता कामा नये. माझ्या वडिलांच्या मृत्यूचा बदला मी घेणार. मी त्यांना एक-एक करुन संपवेन', असे ११ वर्षांच्या वर्तिका मोगाने म्हटले आहे.

surendra monga
Pune Accident : हळदीचा कार्यक्रम आटोपून परतताना दुचाकीचा अपघात, MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाचा मृत्यू

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने घेतला. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्डे भारताने नष्ट केले. या १०० पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले. यानंतर चवताळेल्या पाकिस्तानने भ्याड हल्ले करायला सुरुवात केली. वेळोवेळी भारताने हे हल्ले हाणून पाडले. युद्धजन्य परिस्थितीत दोन्ही देशांनी युद्धविराम घेण्याच्या निर्णयावर सहमती दाखवली. पण नंतर पाकिस्तानने पुन्हा सीमावर्ती भागात गोळीबार सुरु केला.

surendra monga
मदरसाच्या अनधिकृत बांधकामावर KDMC चा हातोडा, कारवाईदरम्यान कल्याणमध्ये तणाव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com