मदरसाच्या अनधिकृत बांधकामावर KDMC चा हातोडा, कारवाईदरम्यान कल्याणमध्ये तणाव

Kalyan news in marathi : कल्याणमधील रहेजा परिसरात सत्यम इमारतीमधील मदरशाचे अनधिकृत बांधकाम कल्याण-डोबिंवली महानगरपालिकेकडून तोडण्यात आले आहे. बेकायदेशीरपणे मदरसा बांधल्याने कारवाई करण्यात आली आहे.
Kalyan news
Kalyan news X
Published On

अभिजीत देशमुख, साम टीव्ही, प्रतिनिधी

Kalyan News : कल्याण पश्चिमेकडील रहेजा कॉम्प्लेक्स या परिसरात सत्यम इमारतीमधील मदरशाचे अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार एका महिला डॉक्टरकडून करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत कल्याण डोबिंवली महानगरपालिकेने पोलीस बंदोबस्तामध्ये मदरसाच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमधील रहेजा कॉम्प्लेक्समधील एका इमारतीमध्ये मदरसाचे अनधिकृतपणे बांधकाम करण्यात आले होते. एका रहिवाशी इमारतीच्या तळमजल्यावर हा मदरसा इमारतीच्या बांधकामात बदल करुन उभारण्यात आला होता. या संदर्भात केडीएमसीकडे एका महिला डॉक्टरने केली होती.

Kalyan news
भयंकर! जाड्या-जाड्या म्हणून हिणवलं, २० KM पाठलाग अन् २ तरुणांवर धाडधाड गोळ्या झाडल्या

तक्रारीनंतर कल्याण डोबिंवली महानगरपालिकेकडून तोडक कारवाईला सुरुवात करण्यात आली. मदरश्यावरील कारवाई दरम्यान परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही स्थानिक रहिवाश्यांनी अधिकाऱ्यांना बांधकाम पाडल्यासंदर्भात जाब विचारण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी मध्यस्थी करत वातावरण शांत केले.

Kalyan news
Crime : घरात घुसले, सामान चोरलं; चोरांकडून महिलेला जबर मारहाण अन्...,घटनेनं खळबळ

कल्याणमधील रहेजा परिसरात बेकायदेशीर पद्धतीने मदरशाचे बांधकाम करण्यात आले होते. या बांधकामाच्या विरोधात तक्रार केल्यानंतर कल्याण-डोबिंवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवत जमीनदोस्त केले. कारवाईदरम्यान काही वेळा तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Kalyan news
Pune Accident : हळदीचा कार्यक्रम आटोपून परतताना दुचाकीचा अपघात, MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com