Crime : घरात घुसले, सामान चोरलं; चोरांकडून महिलेला जबर मारहाण अन्...,घटनेनं खळबळ

Raigad Crime News : रायगडच्या माणगावमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या अज्ञातांनी ७० वर्षीय वृद्ध महिलेला मारहाण केली. मारहाणीत या महिलेचा मृत्यू झाला.
Raigad Mangaon Police
Raigad Mangaon PoliceX
Published On

सचिन कदम, साम टीव्ही, प्रतिनिधी

रायगड जिल्ह्याच्या माणगावमधून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चोरांनी एका घरात घुसून एका महिलेला जबर मारहाण केली. या मारहामीत वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संगीता मनोहर मोकाशी (वयवर्ष - ७०) या माणगाव तालुक्यातील येरद गावात राहत होत्या. त्यांच्या राहत्या घरात अज्ञात चोरांनी घुसखोरी केली. चोरी करताना त्यांनी संगीता मोकाशी यांना मारहाण केली. मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर घरातील सामान लंपास करुन चोरांना पलायन केले.

Raigad Mangaon Police
Pune Accident : हळदीचा कार्यक्रम आटोपून परतताना दुचाकीचा अपघात, MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाचा मृत्यू

चोरांनी संगीत यांच्या घरातून सोन्याच्या कानतल्याचे जोड, गळ्यातील मंगळसूत्र, हातात घातलेल्या बेंटेक्सच्या बांगड्या आणि दोन मोबाईल फोन चोरी केली. एकूण ३८ हजार ४०० रुपयांच्या ऐवजाची चोरी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या चोरांना पकडण्यासाठी माणगाव पोलिसांनी शोधमोहिम सुरु केली आहे.

Raigad Mangaon Police
भयंकर! जाड्या-जाड्या म्हणून हिणवलं, २० KM पाठलाग अन् २ तरुणांवर धाडधाड गोळ्या झाडल्या

माणगाव तालुक्यातील येरद गावात ७० वर्षांच्या वृद्ध महिलेला मारहाण केल्यानंतर चोरांनी घरातील सामान पळवून नेले. जबर मारहाणीत वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. या घटनेमुळे येरद गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. चोरांना शोधून त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Raigad Mangaon Police
आजोबा शहीद, वडील, काका अन् सख्खा भाऊ बॉर्डरवर; लग्नाची हळद अंगावरच, मोठा भाऊ सीमेवर रवाना, सांगलीतल्या रुपनूर कुटुंबाला सलाम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com