आजोबा शहीद, वडील, काका अन् सख्खा भाऊ बॉर्डरवर; लग्नाची हळद अंगावरच, मोठा भाऊ सीमेवर रवाना, सांगलीतल्या रुपनूर कुटुंबाला सलाम

Sangli Rupnar Family : सांगली जिल्ह्यातील खंडेराजुरी गावचे प्रज्वल हिंमत रूपनूर २०२०ला मराठा लाईफ इन्फंट्रीमध्ये भरती झाले. प्रज्वल हे लग्नासाठी दीड महिन्याची सुट्टी घेऊन आले होते.
sangli Khanderajuri  Jawan prajjwal rupnur return to army camp
sangli Khanderajuri Jawan prajjwal rupnur return to army camp Saam Tv News
Published On

सांगली : भारत आणि पाकिस्तानमध्ये बॉर्डवर असलेल्या तणावामुळे सैनिकांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आहे त्या परिस्थितीत निघण्याचे आदेश त्यांना दिले गेले आहेत. यामध्ये कोणी सुट्टीवर आलेलं, कोण लग्नासाठी आलेलं होतं, मात्र आता त्यांना लगोलग निघावं लागत आहे. नुकतेच लग्न झालेलं आणि अंगावरची हळद अजून सुकलेलीही नाही, खंडेराजुरी येथील जवान प्रज्वल रुपनूर हे देशाच्या रक्षणासाठी सीमेकडे रवाना झाले आहेत. प्रज्वल यांचे वडील, काका आणि सख्खा भाऊ सुद्धा सध्या देशसेवेच्यासाठी सीमेवर तैनात आहेत. तर प्रज्वल यांचे आजोबा सुद्धा सैन्य दलात कार्यरत होते. रुपनूर कुटुंबीयांनी देश सेवेसाठी जाणाऱ्या जवान प्रज्वल रुपनूर यांचे औक्षण केलं. तर ग्रामस्थांनी प्रज्वल यांच्यावर पुष्पवृष्टी केली.

सांगली जिल्ह्यातील खंडेराजुरी गावचे प्रज्वल हिंमत रुपनूर २०२०ला मराठा लाईफ इन्फंट्रीमध्ये भरती झाले. प्रज्वल हे लग्नासाठी दीड महिन्याची सुट्टी घेऊन आले होते. प्रज्वल यांचा १४ एप्रिल रोजी तृप्ती दुधाळ यांच्याशी विवाह झाला. दरम्यान ऑपरेशन सिंदुरचा मेसेज आल्यानंतर सुट्टी रद्द करून लगेच ते भुज येथे हजर राहण्यासाठी रवाना झाले.

sangli Khanderajuri  Jawan prajjwal rupnur return to army camp
Satara Accident: साताऱ्यात भाविकांच्या मिनी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, मध्यरात्री ट्रकला धडकली; तिघांचा मृत्यू, ८ जण जखमी

घरातून निघताना रुपनूर कुटुंबीयांनी जवान प्रज्वल रुपनूर यांचं औक्षण केलं. तर मिरज रेल्वे स्टेशनवर आल्यावर सामाजिक कार्यकर्ते अशोक चौगुले, हर्षद पाटील, वैभव माने, अक्षदा चौगुले आणि अन्य ग्रामस्थांनी प्रज्वल यांच्यावर पुष्पवृष्टी केली. रेल्वे स्टेशनवर असणाऱ्या प्रवाशांनी सुद्धा देशाच्या रक्षणासाठी सीमेवर जाणाऱ्या प्रज्वल यांना पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

रुपनूर यांची तिसरी पिढी सैन्यात आहे. आजोबा स्वर्गीय भूपाल रुपनूर सैन्यात होते. त्यानंतर प्रज्वल यांचे वडील सुभेदार हिंमत रूपनूर पूंछमध्ये तैनात आहेत. तर चुलते गोरख रूपनूर सध्या काश्मीर सीमेवर आहेत. तर प्रज्वल यांचे धाकटे बंधू प्रमिल रुपनूर बांगलादेश सीमेवर आहेत. घरातील सर्व पुरुष मंडळी देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात आहेत. घरात सध्या फक्त महिला असून, आपल्या कुटुंबातील सैनिकांनी ऑपरेशन सिंदुर ही मोहीम यशस्वी करून यावे अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत.

sangli Khanderajuri  Jawan prajjwal rupnur return to army camp
Pune Accident : हळदीचा कार्यक्रम आटोपून परतताना दुचाकीचा अपघात, MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com