कुक्कुटपालकांसाठी महत्त्वाची बातमी! 'बर्ड फ्लू'साठी पहिली स्वदेशी H5N1 लसची निर्मिती, कधीपासून मिळणार लस?

H5N1 Bird Flu Vaccine : ICAR–नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ॲनिमल डिसीजेस (NIHSAD) ने 'बर्ड फ्लू'वर एक लस विकसित केलीय. २० नोव्हेंबर रोजी लॉन्च केली जाणार आहे. ही लस नेमकी काय आहे आणि ती कशी काम करते, ते येथे जाणून घेऊ.
India's first indigenous H5N1 bird flu vaccine for poultry
India's first indigenous H5N1 bird flu vaccine for poultrysaam tv
Published On: 
Summary
  • कुक्कुटपालनातील कोंबड्यांसाठी विकसित करण्यात आलेली बर्ड फ्लू लस

  • आयसीएआर एनआयएचएसएडीने विकसित केली लस

  • २० नोव्हेंबरला भोपाळमध्ये बर्ड फ्लू लसीचे लोकार्पण

H5N1 एव्हियन इन्फ्लुएंझा याला बर्ड फ्लू म्हणूनही ओळखले जाते. भारताने हा रोग रोखण्यासाठी एक लस विकसित केलीय.बर्ड फ्लूमुळे कुक्कुटपालनावर मोठा परिणाम होतो. पोल्ट्री फार्म चालकांना मोठा आर्थिक नुकसान सहन करावं लागतं. त्यामुळे बर्ल्ड प्लू विरोधात करण्यात आलेली लस एक मोठं यश असल्याचं म्हटलं जातंय.

२० नोव्हेंबर रोजी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान भोपाळमध्ये या लसीच करून ती देशाला समर्पित करतील. भोपाळस्थित 'आयसीएआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ॲनिमल डिसीजेस' (ICAR–NIHSAD) द्वारे विकसित केलेली ही लस कोंबड्यांना—आणि सर्वसाधारणपणे कुक्कुटपालनातील पक्ष्यांना—H5N1 विषाणूपासून संरक्षण देण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

बर्ड फ्लूच्या वाढत्या घटना

देशाच्या विविध भागांत बर्ड फ्लूचा प्रसार झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पक्ष्यांचा मृत्यू होत आहे. हे मृत्यू रोखण्यासाठी एक लस विकसित करण्यात आली आहे. कुक्कुटपालन किंवा इतर पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्यास मोठे आर्थिक नुकसानही होते. यामुळे स्थानिक पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते, पक्ष्यांच्या हालचालींवर निर्बंध घालावे लागू शकतात आणि संसर्गाचा अधिक प्रसार रोखण्यासाठी पक्ष्यांना नष्ट करावे लागण्याचीही वेळ येऊ शकते. अशा परिस्थितीत, ही लस या सर्व आव्हानांचा सामना करण्यास मदत करू शकते.

India's first indigenous H5N1 bird flu vaccine for poultry
ऊस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! आता साखरेचे दर वाढले की शेतकऱ्यांनाही मिळेल फायदा; साताऱ्यातील बैठकीत काय ठरलं?

सरकारने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय की, बर्ड फ्लूचा उद्रेक भारताच्या जीडीपी वाढीवर १.५ टक्क्यांपर्यंत परिणाम करू शकतो. जर या रोगावर वेळीच नियंत्रण मिळवले नाही, तर देशातील सुमारे २० टक्के कुक्कुटपालन (पोल्ट्री) बाधित होऊन नष्ट होऊ शकते. २००६ मध्ये झालेल्या बर्ड फ्लूच्या उद्रेकादरम्यान, भारताला २,००० ते ३,००० कोटी रुपयांचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नुकसान सहन करावे लागले होते.

India's first indigenous H5N1 bird flu vaccine for poultry
आंब्याच्या झाडांना लागली सलाईन! आमराईतील प्रत्येक झाडाला छत्री अन् एक IV; उष्णतेपासून बाग वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग

दरम्यान भारतात तयार झालेली H5N1 लस भोपाळ येथील ICAR-NIHSAD द्वारे तयार करण्यात आली आहे. ही लस H5N1 क्लेड (clade) 2.3.4.1a ला लक्ष्य करते. यामुळे देशभरात सध्या पसरत असलेल्या बर्ड फ्लूच्या प्रकारांचा सामना करण्याची क्षमता अधिक बळकट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.