ऊस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! आता साखरेचे दर वाढले की शेतकऱ्यांनाही मिळेल फायदा; साताऱ्यातील बैठकीत काय ठरलं?

Satara Sugarcane Farmers : साताऱ्यातील ऊसदर आंदोलनाला मोठे यश मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे. साखर कारखानदारांनी ७०:३० आरएसएफ फॉर्म्युल्यानुसार पैसे देण्याबाबत लेखी आश्वासन दिले आहे. बैठकीत नेमकं काय ठरलं हे जाणून घ्या.
Satara Sugarcane Farmers Get Relief | 70:30 Rsf Formula Agreed
Satara Sugarcane Farmers Get Relief | 70:30 Rsf Formula Agreedsaam tv
Published On: 
Summary
  • सातारा जिल्ह्यातील ऊसदराच्या प्रश्नावर शेतकरी संघटनांनी आंदोलन उभारले होते.

  • शेतकरी संघटनांची प्रतिटन ४,२०० रुपये दराची मागणी होती.

  • जिल्हाधिकाऱ्यांच्या ३,८०० रुपये दराच्या परिपत्रकानंतर शेतकऱ्यांमध्ये नाराजी

ओंकार कदम, साम प्रतिनिधी

ऊसदराच्या प्रश्नावर सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि साखर कारखानदार उपस्थित होते. या बैठकीत ऊसदर वाढीसह आरएसएफच्या ७०:३० फॉर्म्युला ठरलाय. या फॉर्म्युल्यानुसार शेतकऱ्यांना रक्कम देण्याबाबत कारखानदारांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर लेखी आश्वासन दिल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिली.

­सातारा जिल्ह्यात ऊस दराचा प्रश्न पुन्हा पेटला असून प्रतिटन ४,२०० रुपये दर मिळण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाला प्रतिटन ३,८०० रुपये दर द्यावा, असे परिपत्रक काढल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. याचे पडसाद रविवारी सातारा, कोरेगाव व कराड तालुक्यांत पुन्हा उमटले होते. कराड तालुक्यातील शिरवडे फाटा येथे संतप्त शेतकऱ्यांनी या परिपत्रकाची होळी केली. शेतकऱ्यांनी कारखान्यांविरोधात आंदोलन उभारलं होतं. यावर आज जिल्हाधिकारी कार्यालयात कारखानदार आणि शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाची बैठक झाली.

Satara Sugarcane Farmers Get Relief | 70:30 Rsf Formula Agreed
आंब्याच्या झाडांना लागली सलाईन! आमराईतील प्रत्येक झाडाला छत्री अन् एक IV; उष्णतेपासून बाग वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग

या बैठकीत शेतकरी आणि कारखानदारांचा फॉर्म्युला ठरलाय. यापूर्वी कारखान्यांनी जाहीर केलेला ३८०० रुपयांचा दर शेतकऱ्यांना मान्य नव्हता. मात्र, विविध शेतकरी संघटनांनी एकत्र येत ताकदीने आंदोलन केल्यामुळे दरवाढीचा मार्ग मोकळा झाला. यापुढे साखरेच्या दरात वाढ झाल्यास त्यानुसार शेतकऱ्यांना वाढीव रक्कम देण्याचे तसेच आरएसएफच्या ७०:३० फॉर्म्युल्यानुसार पैसे देण्याचे कारखानदारांनी लेखी मान्य केले आहे.

Satara Sugarcane Farmers Get Relief | 70:30 Rsf Formula Agreed
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! कृषी योजनांचा लाभ मिळवायचाय? ई-केवायसी अन् फार्मर आयडी आहे गरजेचं

यंदा फलटण तालुक्यातील कारखान्यांनीही इतर कारखान्यांच्या बरोबरीने दर देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कारखान्यांमध्ये ऊसदरासाठी स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्याची आर्थिक घडी ऊसशेती आणि साखर उद्योगावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून देण्यासाठी सर्व शेतकरी संघटना एकजुटीने लढा देत राहतील. ३९०० रुपयांचा पहिला टप्पा मिळवण्याबरोबरच अंतिम दर मिळवण्यासाठीही आमचा संघर्ष सुरू राहणार असून त्यात शंभर टक्के यश मिळवू,असा विश्वास राजू शेळके यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.