
जम्मूमधील आर एस पुरा भागात आंतरराष्ट्रीय सीमेवर झालेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक इम्तियाज हे शहीद झाले आहेत. बीएसएफने ही दु:खद माहिती एक्स या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्टद्वारे दिली आहे. पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात आणखी एका भारतीय जवानाला वीरमरण आले आहे.
"१० मे २०२५ रोजी जम्मू जिल्ह्यातील आर एस पुरा परिसरात आंतरराष्ट्रीय सीमेवर झालेल्या गोळीबारामध्ये बीएसएफ उपनिरीक्षक इम्तियाज यांना वीरमरण आले आहे. देशाच्या सेवेत दिलेल्या सर्वोच्च बलिदानाला आम्ही सलाम करतो. बीएसएफ सीमा चौकीवर नेतृत्त्व करताना त्यांनी आघाडीवरुन शौर्याने नेतृत्त्व केले", असे सीमा सुरक्षा दलाच्या एक्स पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.
भारत आणि पाकिस्तान यांनी युद्धविरामाला सहमती दर्शवली होती. ५.३० च्या सुमारास हा निर्णय दोन्ही देशांनी मान्य केला. त्यानंतर अवघ्या तीन तासात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. पाकिस्तानने सीमावर्ती भागात गोळीबार केला आहे. पाकच्या गोळीबाराला भारतानेही चोख प्रत्त्युत्तर दिले आहे.
पहलगाम हल्यानंतर भारत पाकिस्तान संबंध ताणले गेले. ऑपरेशन सिंदूर राबवून भारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्डे नष्ट केले. त्यानंतर चवताळलेल्या पाकिस्तानने भारतावर वारंवार हल्ले करण्याचा प्रयत्न केला. हे प्रयत्न भारताने हाणून पाडले. तणाव वाढत गेल्याने भारत आणि पाकिस्तान यांनी युद्धविराम निर्णयावर संमती दर्शवली. पण काही तासांतच पाकिस्तानने पुन्हा सीमावर्ती भागात गोळीबार झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.